Banking News : देशभरातील करोडो बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आरबीआयकडून लवकरच काही बँक ग्राहकांचे खाती बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रातील मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून आत्तापर्यंत बँकिंग क्षेत्राशी निगडित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
2014 मध्ये मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी पीएम जनधन योजना सुरू केली होती. या योजनेमुळे देशभरात जवळपास 59 कोटी बँक अकाउंट ओपन झाले. या योजनेअंतर्गत नागरिकांना झिरो बँक बॅलन्स सह अकाउंट ओपन करून दिले जाते.

ही योजना खेड्यापाड्यातील सर्वसामान्य गरीब जनतेला बँकेची जोडण्यासाठी सुरू करण्यात आली. कोणताही खर्च न करता बँक अकाउंट ओपन करता येत असल्याने या योजनेला सुरुवातीच्या टप्प्यात उदंड प्रतिसाद मिळाला.
या योजनेअंतर्गत ग्राहकांना सेविंग अकाउंट ओपन करून दिले जाते. तसेच अकाउंट धारकांना विमा आणि पेन्शन सारख्या सुविधा सुद्धा दिल्या जातात. कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही सरकारी तसेच खाजगी बँकेत जनधन योजनेअंतर्गत अकाउंट ओपन करू शकतो.
हे अकाउंट ओपन करण्यासाठी किमान ठेवीची कोणतीच मर्यादा नाही. म्हणजे एकही रुपया न भरता ग्राहकांना अकाउंट ओपन करून दिले जाते. या अकाउंट मध्ये ठेवलेल्या पैशांवर ग्राहकांना व्याज मिळते.
एक लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. सामान्य परिस्थितीत 30 हजाराचा जीवन विमा मिळतो. असे बँक अकाउंट सहा महिन्यांसाठी चालू ठेवले तर 5 हजार रुपयांपर्यंतची ओवरड्राफ्टची सुविधा मिळते.
पेन्शनची सुविधा दिली जाते. म्हणजे जनधन बँक अकाउंट सर्वसामान्यांसाठी फायद्याचे आहे. दरम्यान आता याच जनधन बँक खातेधारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे. खरंतर सुरुवातीच्या टप्प्यात ज्या लोकांनी जनधन अकाउंट ओपन केले होते त्यांना आता पुन्हा एकदा केवायसी करावी लागणार आहे.
देशभरातील जवळपास दहा कोटी जनधन बँक अकाउंटला दहा वर्षांचा काळ पूर्ण होतोय. त्यामुळे आता या लोकांना पुन्हा एकदा केवायसी करावी लागणार आहे. बँकेच्या नियमानुसार दहा वर्षांपेक्षा जुन्या बँक अकाउंटला केवायसी ची आवश्यकता असते.
यानुसार जुन्या जनधन बँक अकाउंटधारकांना देखील केवायसी करावी लागणार आहे. यासाठी 30 सप्टेंबर ची तारीख शेवटची राहणार आहे. या तारखेपर्यंत केवायसी केली नाही तर अशा बँक ग्राहकांचे अकाउंट बंद करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून एक जुलैपासून एक विशेष मोहीम सुद्धा हाती घेण्यात आली आहे.
केवायसी मध्ये ग्राहकांना नाव, पत्ता आणि फोटो अपडेट करावा लागतो. यामुळे ग्राहकांची फसवणूक टळते. आतापर्यंत सरकारने देशभरातील एक लाख ग्रामपंचायतमध्ये शिबिर लावून केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान ज्या लोकांनी 2014 – 15 मध्ये जनधन अकाउंट ओपन केलं असेल त्यांनी