सावधान ! 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ‘या’ 19 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Published on -

Weather Update : आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील मुसळधार पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी होती. अंगणवाडी पासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वच शाळा आज काही ठिकाणी बंद होत्या.

मराठवाड्यातील बीडमध्ये देखील आज शाळा बंद होत्या. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शाळांना देखील आज सुट्टी देण्यात आली होती. मान्सून आता अंतिम टप्प्यात आहे पण शेवटच्या टप्प्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातलाय.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी पिक पाण्याखाली गेली आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा अशी मागणी उपस्थित होत आहे. दरम्यान आज फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई जाहीर केली आहे.

येत्या काही दिवसांनी आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. पण शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत फारच तुटपुंजी असल्याचा दावा होतोय.

यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अशी आग्रही मागणी विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून होत आहे. अशातच हवामान खात्याने उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. आता आणखी काही दिवस शेतकऱ्यांना आपल्या पिकांची, पशुधनाची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम असेल. तर काही ठिकाणी तापमानात चढ-उतार सुरु राही.

राज्यात समिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. उद्या 24 सप्टेंबरला तर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ म्हणजे राज्यात जवळपास सगळीकडे वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. त्यामुळे बुधवारी शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील उद्या सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मुंबई

पालघर

ठाणे

रायगड

पुणे

सोलापूर

छत्रपती संभाजीनगर

जालना

बीड

लातूर 

धाराशिव

धुळे 

नंदुरबार 

जळगाव 

अमरावती

यवतमाळ 

गडचिरोली 

गोंदिया 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe