Government Decision : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे. बुधवारी संपन्न झालेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी कामाची राहणार आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभर नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या उत्सवाची संपूर्ण देशभर मोठी धूम पाहायला मिळत आहे.

नवरात्र उत्सव नंतर देशात दिवाळीची धमाल सुरू होणार आहे. ऑक्टोबर मध्ये संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरम्यान दिवाळीच्या आधीच काही सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे.
नुकत्या संपन्न झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला.
खरे तर दरवर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो. यंदाही रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार असून यावर्षी 78 दिवसांच्या पगार इतका बोनस दिला जाणार असल्याची बातमी समोर येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 1.09 दशलक्ष रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शासनाच्या या निर्णयाची नुकतीच माहिती दिली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगारा इतका यावर्षी बोनस दिला जाईल अशी माहिती वैष्णव यांनी दिली. केंद्र सरकारने 10.91 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
या संबंधित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झालेल्या बोनस करिता शासनाच्या तिजोरीवर 1865.68 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
पण या बोनसमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे कार्यक्षमता वाढेल तसेच त्यांना दिवाळी सारखा मोठा सण आपल्या परिवारासमवेत उत्साहात साजरा करता येईल.
यामुळे सदर निर्णयाचे साऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. आता रेल्वे कर्मचाऱ्यांना जसा बोनस जाहीर करण्यात आला आहे तसाच बोनस इतरही केंद्रीय कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात यावा अशी मागणी उपस्थित केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनस देण्याची मागणी उपस्थित होऊ लागली आहे. दरवर्षी केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो आणि यंदाही या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. पुढील महिन्यात या बोनसची घोषणा होईल अशी आशा आहे.