Post Office च्या RD मध्ये दरमहा 2200 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार ?

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच वाढली आहे.

कारण की या ठिकाणी गुंतवणूकदारांना बँकांच्या एफडी योजनांपेक्षा तसेच इतर बचत योजनांपेक्षा अधिकचे व्याज मिळते. पण आजही काही लोक सुरक्षित गुंतवणुकीला अधिक प्राधान्य दाखवतात.

अलीकडे निश्चित आणि सुरक्षित परताव्यासाठी पोस्टाच्या तसेच गव्हर्मेंट बचत योजनांमध्ये गुंतवणुकीला महत्त्व दाखवले जात आहे. काही लोक बँकांच्या एफडी योजनांमध्ये पैसा लावतात. पण यावर्षी एफडी योजनांवरील व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध बँकांनी आपल्या एफडीचे व्याजदर सुद्धा घटवले आहेत. अशा स्थितीत अनेक लोक पोस्टाच्या बचत योजनांकडे वळले आहेत.

दरम्यान आज आपण पोस्टाच्या आरडी योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोस्टाच्या आरडी योजनेत दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून गुंतवणूकदारांना चांगला मोठा फंड तयार करता येतो.

शेअर मार्केटवर आधारित म्युच्युअल फंडमध्ये ज्या पद्धतीने एसआयपी केली जाते तशीच पोस्टाची आरडी योजना काम करते. पण पोस्टाच्या आरडी योजनेत गुंतवणूकदारांना एक निश्चित व्याज दिले जाते.

आरडी योजना बँकांमध्ये देखील आहेत. पण पोस्टाच्या आरडी योजना ग्राहकांना अधिक व्याज देते. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना आरडी योजनेत गुंतवणूक केल्यास 6.7 टक्के दराने व्याज देत आहे.

पोस्टाची आरडी योजना 60 महिन्यांची म्हणजेच पाच वर्षांची आहे. आता आपण या योजनेत प्रत्येक महिन्याला 2200 यांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

किती रिटर्न मिळणार?

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला 2200 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी एक लाख 57 हजार रुपये मिळणार आहेत. यात गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक एक लाख 32 हजार रुपये राहणार आहे.

उर्वरित रक्कम म्हणजे 25 हजार रुपये सदर गुंतवणूकदाराला व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत. थोडक्यात एक छोटीशी रक्कम गुंतवून देखील आर डी योजना तुम्हाला लखपती बनवू शकते.

ज्या लोकांना एकाच वेळी मोठा पैसा गुंतवता येणे शक्य नाही अशा लोकांसाठी आरडी योजना फायद्याची ठरते. दरमहा एक छोटीशी रक्कम बाजूला करूनही तुम्ही या योजनेच्या माध्यमातून चांगला पैसा जमा करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe