Government Employee Bonus : देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना आज बोनस जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी दसऱ्याच्या आधी बोनस दिला जातो.
यंदाही या कर्मचाऱ्यांना दुर्गापूजा आधीच बोनसची रक्कम मिळणार आहे. खरंतर आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली.

आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत देशभरातील 10.91 लाख गैर-राजपत्रित (नॉन-गॅझेटेड) रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या नोकरदार मंडळीला 78 दिवसांच्या पगाराइतका उत्पादकता संलग्न बोनस देण्यास आज मंजुरी देण्यात आली आहे.
या बोनस साठी केंद्र सरकारच्या तिजोरीवर जवळपास 1866 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे अडीच महिन्याचा बोनस दिला जाणार आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्या बँक अकाउंट मध्ये किती पैसे क्रेडिट होणार याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
रेल्वे कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त किती पैसे मिळतील?
केंद्रातील सरकारकडून कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात रेल्वे कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 17 हजार 951 रुपये बोनस म्हणून मिळणार आहेत.
रेल्वे कर्मचाऱ्यांना ही बोनस योजना 1979 पासून लागू आहे. पण, 1995-96 पासून या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. या अंतर्गत सर्व गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना कोणत्याही पगार मर्यादेशिवाय PLB बोनस दिला जात आहे.
पुढे 2014-15 पासून PLB च्या गणनेसाठी मासिक पगाराची मर्यादा 7,000 रुपये (मूलभूत वेतन + महागाई भत्ता) निश्चित करण्यात आली.
म्हणजेच जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार म्हणजेच मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता मिळून सात हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तरीही त्याला 7000 रुपये हा पगार गृहीत धरूनच बोनस दिला जातोय.
खरे तर, सात हजार रुपये पगार गृहीत धरला तर रेल्वे कर्मचाऱ्यांना अठरा हजार दोनशे रुपये बोनस मिळतो. पण कर आणि इतर कपाती नंतर बोनसची रक्कम 17,951 राहते.
रेल्वे विभागातील कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस
बोनस ट्रॅक मेंटेनर
लोको पायलट
ट्रेन मॅनेजर
स्टेशन मास्टर
सुपरवायझर
तंत्रज्ञ
तंत्रज्ञ सहाय्यक
पॉइंट्समन
मंत्रालयीन कर्मचारी
इतर गट क कर्मचारी