पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा नोकरी करण्याची गरजच नाही ! प्रत्येक महिन्याला मिळणार 20,500 रुपये व्याज

Published on -

Post Office Scheme : आपण सर्वजण आपल्या भविष्याची चिंता करत असतो. आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी आपण आपल्याकडील पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो. अनेकजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतात.

काही लोक सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करतात. काही असे सुद्धा लोक आहेत जे की प्रॉपर्टी मध्ये आपला पैसा लावतात. जमीन प्लॉट घर दुकान अशा स्थावर मालमत्ता खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.

तर काही लोकांना गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम व्याज म्हणून कमवायची असते. यासाठी अनेक जण पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जी की पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच यातून गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम व्याज म्हणून मिळणार आहे.

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम. ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. उतार वयात कोणालाच काम करता येणे शक्य नाही.

अशा स्थितीत पोस्टाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात दरमहा एक निश्चित रक्कम व्याज म्हणून मिळणार आहे.

दरमहा मिळणार 20,500 रुपयांचे व्याज 

 पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये ग्राहकांना आधी फक्त पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करता येत होती. पण आता गुंतवणूकदारांना 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येत आहे.

ही योजना पाच वर्षांची आहे. पण गुंतवणूकदारांना हवे असल्यास ते या योजनेचा कालावधी पुन्हा वाढवू शकतात. या योजनेतील गुंतवणूकदारांना 8.2% दराने व्याज दिले जात आहे.

या योजनेत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना गुंतवणूक करता येते. ज्या लोकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे त्यांना 55 – 60 वर्षांच्या दरम्यान गुंतवणूक करता येते.

या योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर गुंतवणूकदारांना टॅक्स भरावा लागतो. परंतु यात करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर कोणताच टॅक्स लागत नाही.

या योजनेत एकरकमी 30 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दरवर्षी 2.46 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच प्रत्येक महिन्याला वीस हजार पाचशे रुपयांची व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News