Maize Farming : येत्या काही दिवसांनी रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. रब्बी हंगामात आपल्याकडे मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक शेतकरी मक्याची पेरणी करतात. खरिपात मका लागवडीखालील क्षेत्र थोडे अधिक असते. पण रब्बी मध्येही मका लागवडीखालील क्षेत्र काही कमी नाही.

अशा स्थितीत जर तुम्हालाही रब्बी हंगामात मका पेरणी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला मक्याच्या काही सुधारित जातींची माहिती सांगणार आहोत. आज आपण रब्बी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त मक्याच्या काही सुधारित जातींची माहिती पाहूयात.
रब्बी हंगामात मक्याची पेरणी साधारणता ऑक्टोबरच्या दुसऱ्या पहिल्या पंधरवाड्यानंतर सुरू होते. रब्बी मक्याची पेरणी 15 ऑक्टोबर नंतर सुरू होते. साधारणतः 15 नोव्हेंबर पर्यंत याची लागवड सुरू राहते.
मका पेरणीसाठी सरीवरंबा पद्धतीचा वापर करायला हवा जेणेकरून चांगले उत्पादन मिळेल. मक्याची पेरणी टोकन पद्धतीने केली जाते. पेरणीसाठी हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणे पुरेसे ठरते. आता आपण रब्बी हंगामात उत्पादित होणाऱ्या मक्याच्या काही सुधारित जातींची माहिती पाहूयात.
पंचगंगा : हा मक्याचा एक समिश्र वाण आहे. या जातीची रब्बी हंगामात लागवड करता येते. 15 ऑक्टोबर नंतर कधी पण याची पेरणी करता येऊ शकते. शेतकऱ्यांना या जातीपासून साधारणता 40-50 क्विंटल उत्पादन मिळते.
राजर्षी : मका लागवडीतून जर तुम्हाला विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्ही या वाणाची निवड करायला हवी. कारण म्हणजे हा मक्याचा सर्वाधिक उत्पादन देणारा वाण आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जातीचा मका हेक्टरी 100 – 110 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम आहे. हे एक एकेरी संकरित वाण आहे. यामुळे बाजारात या जातीच्या बियाणांची प्रचंड मागणी असते.
करवीर : हे सुद्धा समिश्रवाण आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 – 55 क्विंटल उत्पादन मिळू शकते. संकरित वाणा पेक्षा निश्चितच या जातीपासून कमी उत्पादन मिळते. मात्र कमी खर्चात अधिकचे उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांना या जातीची निवड करण्याचा सल्ला दिला जातो.