रेल्वे कर्मचाऱ्यांनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांनाही मिळणार बोनस!
Bonus News : केंद्रातील सरकारने अलीकडेच रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर केला आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांना जवळपास अडीच महिन्यांचा पगार बोरस म्हणून दिला जाणार आहे.

त्यांना दरवर्षी 78 दिवसांचा पगार बोलून दिला जातो आणि यंदाही 78 दिवसांचा पगार त्यांना बोनस म्हणून वितरित करण्यात येणार आहे. दुर्गा पुजा आणि विजयादशमी निमित्ताने हा बोनस त्यांच्या खात्यात येत्या काही दिवसांनी वर्ग होईल.
दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनंतर आता महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सुद्धा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळी बोनस निमित्ताने दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
स्वतः राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी सरकारकडून 40.61 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती सुद्धा मंत्री महोदयांनी यावेळी दिली आहे.
या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या आधीच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस ची घोषणा करण्यात आली आहे.
यासाठी सरकारकडून निधी पण उपलब्ध झाला आहे. यामुळे आता लवकरच संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनसची रक्कम जमा होणार आहे. दरवर्षी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळी बोनस दिला जातो आणि यंदाही हा बोनस त्यांच्या खात्यात लवकरच वर्ग होणार आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांची सेवा करतात. राज्यातील महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी त्या महत्वाची सेवा बजावतात.
आता त्यांच्या कार्याचा गौरव तर झालाच पाहिजे. यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपयांचा दिवाळी बोनस वितरित करण्यात येणार आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी ही रक्कम एक भाऊबीजेची भेट म्हणून फडणवीस सरकारकडून वितरित करण्यात येईल.