सोने की शेअर मार्केट, 15 वर्षात गुंतवणूकदारांना कुठून मिळालाय सर्वाधिक रिटर्न ? वाचा सविस्तर

Published on -

Gold Vs Share Market : पुढील महिन्यात संपूर्ण देशभर दिवाळीची धूम असेल. दिवाळीत अनेकजण सोने खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. पण सोन्यात गुंतवणूक करण्याआधी आजची ही बातमी तुम्ही पूर्ण वाचायला हवी.

खरंतर, गत काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधून चांगला परतावा मिळतोय की सोन्यातून? हा मोठा सवाल आहे.

आज आपण गेल्या पंधरा वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांना कुठून किती रिटर्न मिळालेत याबाबत माहिती पाहणार आहोत. सोन्याने गेल्या काही महिन्यांच्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत.

या वर्षात आत्तापर्यंत सोन्याच्या किमती 58.11% पर्यंत वाढल्या आहेत. सोन्याचे भाव एक लाख 13 हजार रुपये प्रति तोळा असे आहेत. मागील नऊ महिन्यातच सोन्याची किंमत 34 हजार 720 रुपयांनी वाढली आहे.

गेल्या दहा वर्षात सोन्याने यंदा सर्वाधिक रिटर्न दिले आहेत. 2023 मध्ये सोन्यातून फक्त 18.11% रिटर्न मिळाले होते. पण या वर्षात आत्तापर्यंत 58% रिटर्न दिले आहेत. आता आपण मागील पंधरा वर्षांची कामगिरी पाहूयात.

वार्षिक दहा हजाराच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न? 

एखाद्या गुंतवणूकदारांने मागील 15 वर्षात दर दिवाळीला सोन्यामध्ये दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 4.47 लाख रुपये झाले  आहे. यात त्याची गुंतवणूक फक्त दीड लाखाची आहे.

त्याचवेळी जर हेच पैसे तुम्ही शेअर मार्केटच्या निफ्टी 50 च्या ETF मध्ये गुंतवले असते तर तुमचे एकूण मूल्य 3.72 लाख झाले असते. थोडक्यात सोनं गेल्या पंधरा वर्षांच्या काळात शेअर मार्केटला ओव्हरटेक करण्यात यशस्वी ठरले आहे.

सोन्याने मागील काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्वच्या धोरणांमुळे, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली सोन्याची खरेदी, जिओ पोलिटिकल तणाव या सर्व गोष्टी सोन्याचे भाव वाढवण्यास कारणीभूत आहेत.

गत काही वर्षांमध्ये जगभरात पूर्णपणे असुरक्षितता पाहायला मिळाली आहे. आता जेव्हा केव्हा असुरक्षितता दिसून येते तेव्हा सोन्यात गुंतवणूक वाढते. दरम्यान गेल्या काही वर्षांमधील हेच असुरक्षितता सोन्याचे दर वाढवण्यास कारण ठरली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe