Aadhar Card बाबत मोठी अपडेट! आता घरबसल्या मोबाईल नंबर बदलता येणार, ‘या’ तारखेपासून सुरू होणार नवीन सुविधा

Published on -

Aadhar Card बाबत मोठी अपडेट! आता घरबसल्या मोबाईल नंबर बदलता येणार, ‘या’ तारखेपासून सुरू होणार नवीन सुविधा 

UIDAI News : आधार कार्ड धारकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. UIDAI लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करणार आहे.

यामुळे आधार कार्ड मध्ये सहज अपडेट करता येणार आहे. आज भारतात कुठेही गेले तरीदेखील तुम्हाला आधार कार्ड लागणारच आहे. देशात साध एक सिम काढायचं असेल तरीसुद्धा आधार लागत. आधारची उपयोगिता गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढली आहे.

या कागदपत्राविना भारतात कोणतेच शासकीय आणि नेहमी शासकीय काम केले जाऊ शकत नाही. शासकीय योजनांच्या लाभासाठी देखील हे कागदपत्र आवश्यक आहे. गेल्या वर्षी सुरु झालेल्या लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी सुद्धा आधार कार्ड गरजेचे आहे.

महत्वाची बाब म्हणजे आता सर्वच ठिकाणी आधार लिंक केले जात आहे. यामुळे आधार कार्ड मधील माहिती अपडेटेड असणे गरजेच बनलंय. विशेषतः आधार मध्ये तुमचा चालू मोबाईल नंबर असणे अति आवश्यक आहे. कारण की कोणत्याही गोष्टीची पडताळणीसाठी, केवायसी करण्यासाठी आधारशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जातो.

त्यामुळे जेव्हा मोबाईल नंबर चेंज होतो तेव्हा आधार कार्ड धारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्ड वरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागते.

पण आता घरबसल्या ही सुविधा उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार UIDAI नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापासून ही सुविधा सुरू करणार आहे. यासाठी नवीन ॲप्लिकेशन लॉन्च होण्याची शक्यता आहे. नव्याने लॉन्च होणार आहे अँप्लिकेशनमध्ये जाऊन मोबाईल नंबर बदलायचा असल्यास आपला आधार नंबर टाकून मोबाईल कॅमेऱ्यासमोर फेस ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे.

यामुळे आधार कार्ड धारकाचे व्हेरिफिकेशन होणार आहे. अर्थात जी व्यक्ती मोबाईल नंबर बदलत आहे ते आधार कार्ड त्याचेच आहे हे या फेस ऑथेंटीकेशनच्या प्रक्रियेमुळे स्पष्ट होणार आहे.

परंतु सध्या या ॲप्लिकेशनवर काम केले जात आहे. येत्या काही दिवसांनी हे ॲप्लिकेशन पूर्णपणे तयार होईल आणि त्यानंतर मग सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe