महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढली ! ‘या’ 31 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, नव्या अंदाजाने धाकधूक वाढली

Published on -

Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसात राज्यात जी पूरस्थिती तयार झाली त्या पार्श्वभूमीवर आयोगाने या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्यात तयार झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे एमपीएससी साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासात मोठा खंड आला.

यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत अशी मागणी होत होती. यानुसार परीक्षा आता पुढील ढकलल्या आहेत. आयोगाकडून याबाबतचे शुद्धिपत्रक आज निर्गमित करण्यात आले. या शुद्धिपत्रकानुसार आता एमपीएससीकडून घेतली जाणारी संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. आजही राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील जवळपास 97 टक्के भागात पावसाचा अंदाज आहे. या नव्या अंदाजाने आता राज्यातील शेतकऱ्यांची धाकधूक पुन्हा वाढली आहे.

अशा परिस्थितीत आता आपण हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे याबाबत माहिती पाहूयात.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट

अहिल्यानगर 

अकोला

अमरावती

बीड

भंडारा

बुलढाणा

चंद्रपूर

गडचिरोली

गोंदिया

हिंगोली

जालना

कोल्हापूर

लातूर

मुंबई शहर व उपनगर

नागपूर

नाशिक

धाराशिव

पालघर

परभणी

पुणे

रायगड

रत्नागिरी

सांगली

सातारा

सिंधुदुर्ग

सोलापूर

ठाणे

वर्धा

वाशिम

यवतमाळ

पाऊस कधी विश्रांती घेणार?

पंजाबराव डख यांनी 30 सप्टेंबर नंतर राज्यात पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज दिला आहे. खरं तर लवकरच राज्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन हार्वेस्टिंग साठी तयार होणार आहे.

दरम्यान पंजाब रावांनी एक ऑक्टोबरपासून 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहू शकते असा अंदाज दिला आहे. आता शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीसाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News