Government Employee News : महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवण्यात आला. या निर्णयानंतर महागाई भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचला.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला. राज्य कर्मचाऱ्यांसोबतच अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता सरकारने वाढवला.

राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 55 टक्के करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे आता पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे.
यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज समोर येतोय. गेल्या वेळी DA वाढीचा जो निर्णय झाला त्याची अंमलबजावणी जानेवारी महिन्यापासून झाली.
आता पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असून ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% होईल.
दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळण्याआधीच त्रिपुरा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलीये. सध्या सगळीकडे नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. गरबा अन दांडियाच्या उत्साहात नवरात्र उत्सवाचे नऊ दिवस साजरा होणार आहेत.
नंतर विजयादशमी आणि त्यानंतर मग दिवाळीचा मोठा सण साजरा होईल. दरम्यान या सणासुदीच्या हंगामाच्या आधीच त्रिपुरा राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी एक ऑक्टोबर पासून होणार आहे. एक ऑक्टोबर पासून हा वाढीव भत्ता लागू करण्यात येणार असून या निर्णयानंतर तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 36 टक्क्यांवर पोहोचला आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या निर्णयाची घोषणा केली. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 3% डीए आणि डीआर वाढ लागू करण्याची घोषणा केली.
या निर्णयामुळे त्रिपुरा राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्रिपुरा राज्य शासनाचा हा निर्णय राज्यातील 1 लाखांहून अधिक कार्यरत सरकारी कर्मचारी आणि 84 हजार पेन्शन धारकांना फायदा मिळवून देणार आहे.