डीमार्ट मध्ये शॉपिंग करणाऱ्यांसाठी कामाची बातमी! कोणत्या वस्तूंवर किती जीएसटी कमी झाला? DMart ने लावली यादी

Published on -

DMart News : अलीकडे ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड विकसित झालाय. ग्रोसरीपासून ते कपड्यांपर्यंत सारं काही ऑनलाईन खरेदी केलं जात आहे. मोबाईल, एसी, फ्रीज अशा वस्तू सुद्धा ऑनलाईन खरेदी केल्या जातायेत. अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या शॉपिंग साइटवर वेळोवेळी ऑफर लावल्या जातात आणि म्हणूनच ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड वाढलाय.

ऑनलाइन खरेदीमध्ये ग्राहकांच्या हजारो रुपयांची बचत होते. ऑनलाइन शॉपिंग सोबतच डी मार्ट सारख्या सुपर मार्केट मध्ये ग्राहकांची चांगली बचत होत आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोक डी मार्ट मधून शॉपिंग करण्याला अधिक पसंती दाखवतात.

या सुपर मार्केटची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथे तुम्हाला 12 महिने ऑफर मिळते. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने जीएसटी मध्ये रिफॉर्म आणला आहे. जीएसटी चे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी झाला आहे.

याची अंमलबजावणी 22 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. पण कोणत्या वस्तूंवरील जीएसटी कमी झाला आहे याबाबत ग्राहकांना फारशी माहिती नाहीये. पण आता डी मार्टने आपल्या ग्राहकांसाठी कोणत्या वस्तूंवरील जीएसटी कमी झाला आहे याची यादी आपल्या स्टोअर वर लावली आहे. 

या वस्तूवरील GST 12 टक्क्यांवरून 5 टक्के 

कंडेन्स्ड मिल्क

बटर आणि तूप

चीज

पॅक केलेले नमकीन

भुजिया आणि मिश्रण

पॅक केलेले ड्रायफ्रुट्स

पॅक केलेले नट

सॉस

लोणचे

पॅक केलेले फ्रूट ज्यूस

पास्ता आणि स्पेगेटी

इन्स्टंट नूडल्स

फ्रूट जेली

जॅम आणि मार्मलेड

छत्री 

इलेक्ट्रॉनिक नसलेली खेळणी

रबर बॅण्ड्स

स्टीलचे कंटेनर

टेक्सटाईल डोअरमॅट्स

स्टील भांडी

अॅल्युमिनियम व स्टील वस्तू

नॉन-स्टिक फ्रायपॅन

कुकर

कपड्यांचे स्टँड

गालिचे

रनर

आसने  

टेक्सटाईल कॅप्स-हॅट्स

2500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे पादत्राणं, बेडशीट्स, रजई, सोफा कव्हर्स, कम्फर्टर्स

या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के 

चॉकलेट्स

आईस्क्रीम

इंस्टंट कॉफी

बिस्किट्स

कुकीज

साखरेपासून तयार होणाऱ्या कँडीज

बुर्गर व्हीट

प्लँट-बेस्ड मिल्क ड्रिंक्स

कोको पावडर

कोको बटर

कॉर्न फ्लेक्स

पॅकेज्ड सूप्स

हेल्थ ड्रिंक्स  

पाणी बॉटल

केसांचे तेल

शॅम्पू

साबण

शेव्हिंग क्रीम

शेव्हिंग लोशन

आफ्टरशेव्ह लोशन

फेस पावडर

टॅलकम पावडर

टूथपेस्ट

टूथब्रश  

डेंटल फ्लॉस

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe