Havaman Andaj : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला होता. त्यावेळी दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांमधूनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
काही ठिकाणी पिण्याचे पाण्याचे देखील हाल झाले होते. एल निनो मुळे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात तसेच देशातील इतर राज्यांना दुष्काळाची झळ बसली. यावर्षी मात्र परिस्थिती उलटली आहे.

दोन वर्षांपूर्वी कोरड दुष्काळ होता आणि यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. यंदा देखील महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी राज्यात ओला दुष्काळ आलाय.
गेल्या महिन्यात आणि या चालू सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती तयार झाली. यामुळे लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसामुळे पूर्णपणे खराब झाले आहे.
शासनाकडून सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परंतु सरकारने दिलेली नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने आता शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान अजूनही राज्यातील काही भागांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे. यामुळे अनेकांच्या माध्यमातून ही परिस्थिती कधीपर्यंत निवळणार असा सवाल उपस्थित करून केला जातोय.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) 29 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 5 ऑक्टोबरपूर्वी नैऋत्य मोसमी पाऊस परतण्याची शक्यता नाही.
कुठे बरसणार पाऊस
मुंबई
ठाणे
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे
सातारा
कोल्हापूर
नांदेड
लातूर
धाराशिव
गडचिरोली
चंद्रपूर
यवतमाळ