Maharashtra News : सध्या सगळीकडे नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवामुळे रात्री उशिरापर्यंत दांडिया आणि गरब्याचा खेळ सुरु असतो. अनेकजण नवरात्र उत्सवासाठी बाहेर फिरायला जात आहेत. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण गुजरातमध्येही जातात.
गुजरातला नवरात्र उत्सवाची विशेष धूम असते. अशातच आता गुजरातला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलय. आजपासून उधना – भुसावळ रेल्वे मार्गावर एक नवीन सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही गाडी राज्यातील तब्बल 14 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलीये.
या गाडीला उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील अनेक महत्त्वाचा स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलाय. उधना ते ओडिशा मधील ब्रह्मपुरी यादरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. या गाडीचा खानदेशातील सर्वच प्रवाशांना फायदा होणार आहे.
जळगाव धुळे नंदुरबार या खानदेशातील तीनही जिल्ह्यांमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी ही गाडी फायद्याची ठरणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. खरंतर खानदेशातून बहुसंख्य जनता कामानिमित्ताने गुजरातला जाते.
अशा स्थितीत या लोकांसाठी ही नव्याने सुरू झालेली अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन नक्कीच फायद्याची ठरणार आहे. अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन नॉन एसी आहे. या गाडीला नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस म्हणूनही ओळखले जाते.
ही गाडी आठवड्यातून एक दिवस धावणार आहे. आज या गाडीचे उद्घाटन झाले असून आता 5 ऑक्टोबर पासून ही गाडी दर रविवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी उधना स्थानकावरून सुटणार आहे.
6 ऑक्टोबर पासून प्रत्येक सोमवारी ही गाडी ब्रह्मपुरी रेल्वे स्थानकावरून रात्री सोडली जाणार आहे. आता आपण ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याची माहिती पाहूयात.
कोण-कोणत्या स्टेशनवर थांबणार नवीन अमृत भारत एक्सप्रेस
व्यारा
नवापूर
नंदुरबार
दोंडाईचा
शिंदखेडा
अमळनेर
धरणगाव
जळगाव
भुसावळ
मलकापूर
अकोला
बडनेरा
वर्धा
नागपूर
गोंदिया
दुर्ग
रायपूर
महासमुंद
खरियार रोड
कांटाबांजी
टिटलगढ
केसिंगा
मुनीगुडा
रायगडा
पार्वतीपूरम
बोब्बिली
विजयनगरम
श्रीकाकुलम रोड
पलासा