Bonus Shares:- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कंपनीच्या माध्यमातून दिला जाणारा बोनस आणि लाभांश हे आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात. शेअर मार्केट गुंतवणुकीतून मिळणारा परताव्यासोबत आर्थिक दृष्टिकोनातून बोनस शेअर्स आणि लाभांशाचे महत्व अनन्य साधारण असते. सध्या जर आपण मार्केटमध्ये बघितले तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून बोनस शेअर्स जाहीर करण्यात आलेले आहेत व आता गुंतवणूकदारांना आणखी बोनस शेअर मिळवण्याची नामी संधी चालून आलेली आहे. ही संधी म्हणजेच ब्रोकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेडने नुकतीच बोनस शेअरची घोषणा केली असून ही कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे.
एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेड देणार बोनस शेअर्स
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेअर बाजारातील ब्रोकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी एसएमसी ग्लोबल सिक्युरिटी लिमिटेडने गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली असून याबाबत कंपनीने शेअर बाजाराला दिलेली माहिती सांगितली की दोन रुपये दर्शन मूल्याच्या प्रतिशेअर करिता बोनस शेअर दिला जाणार आहे. मात्र कंपनीने याबाबत अजून रेकॉर्ड तारीख जाहीर केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्ड तारखेबाबतचा निर्णय हा नोव्हेंबरच्या अगोदर घेतला जाण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांना कंपनीने लाभांश ही दिला
एसएमसी ग्लोबल सिक्युरिटी लिमिटेड कंपनीने नेहमी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिलेला आहे. या कंपनीच्या शेअरचा शेवटचा एक्स डिव्हिडंड 13 जून 2025 रोजी व्यवहार झाला होता व तेव्हा कंपनीने प्रति शेअर 1.20 रुपये लाभांश दिला होता. तसेच या अगोदर फेब्रुवारी 2025 मध्ये एक्स डिव्हीडंड व्यवहार केला होता व तेव्हा देखील कंपनीने प्रति शेअर 1.20 रुपये लाभांश दिला होता.
कंपनीच्या शेअरचा परफॉर्मन्स कसा?
सध्या या कंपनीच्या शेअरची कामगिरी बघितली तर शुक्रवारी शेअरच्या किंमतीत 1.28 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली व 139.30 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यात मात्र या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 31 टक्क्यांचा प्रॉफिट दिला आहे. परंतु एक वर्ष गुंतवणुकीत गुंतवणूकदारांचे 14 टक्क्यांचे नुकसान झालेले आहे. दोन वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 76% रिटर्न दिला आहे.