पुणेकरांसाठी Good News ! Pune Railway स्थानकावरून आता ‘या’ शहरासाठी चालवली जाणार विशेष एक्सप्रेस

Published on -

Pune Railway News : सध्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून विविध मार्गांवर स्पेशल गाड्या चालवल्या जात आहेत. दरम्यान आता पुण्यातील नागरिकांसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकावरून लवकरच एक विशेष गाडी चालवली जाणार आहे. खरेतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

यंदाही नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरम्यान याच धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले असून पुणे – नागपूर या मार्गावर विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या स्पेशल गाडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. ही विशेष गाडी एक ऑक्टोबरला दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी पुण्यातून सोडली जाणार आहे.

तसेच दोन ऑक्टोबरला रात्री 11 वाजता नागपूरहून सोडली जाईल. या विशेष गाडीला एकूण 18 डबे असतील. त्यामधील 16 डबे हे आरक्षणाशिवाय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर प्रवासी सहज प्रवास करू शकतील. 

कोणकोणत्या स्थानकावर थांबणार विशेष गाडी 

पुणे

दौंड

अहिल्यानगर

बेलापूर

कोपरगाव

मनमाड

चाळीसगाव

पाचोरा

जळगाव

भुसावळ

मलकापूर

शेगाव

अकोला

मूर्तिजापूर

बडनेरा

धामणगाव

पुलगाव

वर्धा

अजनी 

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, प्रवाशांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाडी चालवण्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने विशेष व्यवस्था केली आहे.

प्रवाशांनी गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक थांबणे टाळावे, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. ही विशेष सेवा उपलब्ध झाल्याने पुणे व आसपासच्या भागातील अनुयायांना नागपूरला जाण्यासाठी मोठी सोय होणार असून प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe