Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील सरकारी आणि खाजगी बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुमचेही एखाद्या बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.
खरंतर आरबीआयच्या माध्यमातून देशातील ग्राहकांसाठी वेळोवेळी नियमांमध्ये सुधारणा केली जाते. बँक ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी आरबीआय सतत प्रयत्न करत असते आणि मध्यवर्ती बँकेकडून वेळोवेळी निर्माण मध्ये सुधारणा होत असतात.

आरबीआय ने आता बँक ग्राहकांसाठी पुन्हा एकदा नियमांमध्ये सुधारणा करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर आत्तापर्यंत बँक खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बँक अकाउंट मधील ठेवीसंदर्भात तसेच लॉकर संदर्भात कारवाई करण्यास मोठा उशीर व्हायचा.
पण आता मयत बँक ग्राहकांच्या खात्यांसंदर्भातील दावे वेळेत निकाली निघणार आहेत. यासाठी आरबीआयने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून मयत खातेधारकांच्या नामनिर्देशित व्यक्तीला तसेच कायदेशीर वारसांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान आता आपण आरबीआय ने घेतलेला हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा ग्राहकांना काय फायदा होणार याबाबतची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
आरबीआयने घेतलेला नवा निर्णय काय सांगतो?
रिझर्व्ह बँकेने (RBI) मृत ग्राहकांच्या बँक खात्यांशी, लॉकरशी किंवा ठेवींशी संबंधित दाव्यांसाठी आता नवीन नियम तयार केले आहेत. या नव्या नियमानुसार आता देशातील बँकांना हे दावे 15 दिवसांच्या आत निकाली काढावे लागणार आहेत.
पंधरा दिवसांच्या आत मयत व्यक्तीच्या खात्यासंदर्भातील दावे निकाली निघाले नाहीत तर अशा प्रकरणात संबंधित बँकेला खातेधारकांना नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागणार आहे.
यामुळे नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसांना बँक खात्यातील रक्कम तसेच लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू वेळेत मिळणार आहेत.
दरम्यान बँकेने वेळेत दावे निकाली काढले नाहीत तर खातेधारकाला किती नुकसान भरपाई मिळणार ही रक्कम नंतर ठरवली जाणार असल्याचेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बचत खाते, मुदत ठेवी (एफडी), सेफ डिपॉझिट लॉकर आणि बँकेत ठेवलेल्या इतर वस्तूंसाठी हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. नव्या नियमांची अंमलबजावणी कधीपर्यंत करायची याची डेडलाईन सुद्धा आरबीआयने निश्चित केली आहे.
हे नवे नियम 31 मार्च 2026 पर्यंत सर्व बँकांना लागू करावे लागणार अशी माहिती यावेळी समोर आली आहे. अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक (मृत ग्राहकांच्या दाव्यांचे निपटारा) निर्देश, 2025 ची अंमलबजावणी बँकांमध्ये लवकरच होणार आहे.