Investment Scheme:- सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परतावा या दोन्ही गोष्टी या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण आपण कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित रहावा ही प्रत्येकाची इच्छा असते व त्यामुळेच गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या पर्यायाची निवड करणे अतिशय गरजेचे असते. यामध्ये बँकेच्या एफडी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना यासाठी फायद्याच्या ठरताना दिसून येत असून त्यातल्या त्यात पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढताना आपल्याला दिसून येत आहे. अगदी याच प्रमाणे तुम्हाला देखील तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवायची असेल तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग रिकरिंग डिपॉझिट एक उत्तम अशी बचत योजना आहे. या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला नियमितपणे महिन्याला बचत करता येते व तिमाही चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो व गुंतवणुकीसाठी सरकारी हमी देखील राहते.
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग रिकरिंग डिपॉझिट योजनेचे वैशिष्ट्ये
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही भारतीय नागरिकाला खाते उघडता येते व यामध्ये सिंगल, संयुक्त आणि अल्पवयीन मुलाच्या नावाने त्याचे पालक खाते उघडू शकतात. यामध्ये तुम्हाला फक्त दरमहा शंभर रुपयाची देखील गुंतवणूक करता येते व कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. यात तुम्हाला पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते व 6.7% प्रति वर्ष दराने व्याज सध्या दिले जात आहे. या योजनेत मिळणाऱ्या व्याजाची गणना तिमाही चक्रवाढ पद्धतीने केली जाते व त्यामुळे मिळणारा परताव्यात मोठी वाढ होते.तसेच तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला किंवा पंधरा तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा करावे लागतात. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या योजनेत खाते उघडल्यानंतर एक वर्ष झाला की तुम्ही जमा केलेला रकमेच्या 50% पर्यंत तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते. जर एखाद्या महिन्याला तुम्ही पैसे जमा करू शकला नाही तर प्रत्येक शंभर रुपयावर तुम्हाला एक रुपये दंड आकाराला जातो. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त चार वेळा हप्ते चुकवू शकतात.परंतु सलग जर चार वेळेस हप्ते चुकले तर खाते बंद होऊ शकते. परंतु ते पुन्हा सुरू करता येते.

महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली तर…
तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत महिन्याला दहा हजार रुपये गुंतवले तर या योजनेच्या मॅच्युरिटी नंतर म्हणजेच पाच वर्षांनी तुम्हाला एक लाख 13 हजार 658 रुपयांचा हमी परतावा मिळतो. या हिशोबाने बघितले तर पाच वर्षात तुमचे एकूण सहा लाख रुपये जमा होतात व त्यावर तुम्हाला एक लाख 13 हजार 658 रुपये व्याज मिळते. अशा पद्धतीने एकूण तुमची गुंतवणूक आणि मिळणारे व्याज मिळून तुमचा एकूण निधी सात लाख 13 हजार 658 रुपयांच्या आसपास जमा होतो.