Business Idea:- आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी कार असतात व त्यातील एखादी कार जास्त करून वापरात येत नाही व ती घरासमोर रिकामी उभे असते. अशा प्रसंगी तुम्ही त्या कारचा वापर करून महिन्याला चांगली रक्कम मिळवू शकतात. विशेष म्हणजे याकरिता तुम्हाला खूपच काहीतरी वेगळे करण्याची गरज भासत नाही. कारण जुमकार सारखे ऑनलाइन प्लॅटफॉर्म यासाठी आपल्याला मदत करत असतात व हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म कार होस्टिंग देतात. अशाप्रकारे तुम्ही जर तुमची कार दररोज वापरत नसाल तर ती कार तुम्हाला या होस्टिंगद्वारे तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळवून देऊ शकते.
कार होस्टिंग म्हणजे नेमके काय?
तुम्ही जर तुमची कार फारशी वापरत नसाल तर तुम्ही ती कार होस्टिंग प्लेटफार्मवर लिस्ट करू शकता. यावर कारचे मॉडेल आणि किमतीसारखी माहिती दिली जाते व प्रवासी गरजेनुसार तुमची कार बुक करतात व प्रत्येक बुकिंगसाठी तुम्हाला पैसे मिळतात. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होस्ट केलेली कार सरासरी महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमावते. ही रक्कम तुम्हाला कारचा ईएमआय भरण्यासाठी किंवा जास्तीचे उत्पन्न मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये तुम्ही कार लिस्ट केल्यानंतर पहिली बुकिंग तीन ते चार दिवसांच्या आत मिळते. विशेष म्हणजे सध्या देशातील टीयर दोन आणि टियर तीन शहरांमध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढत असून अतिरिक्त कमाई साठी नक्कीच हा मार्ग फायद्याचा ठरू शकतो. जर आपण या प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता बघितली तर होस्टिंग इनसाईट 2025 च्या अहवालानुसार साधारणपणे 92 टक्के प्रवाशांचे व्यवहार या माध्यमातून चांगले दिसून आले असून सरासरी रेटिंग 4.5/5 इतकी देण्यात आलेली आहे. या माध्यमातून एखादा सक्रिय होस्ट वर्षाला अंदाजे 60 बुकिंग करतो. त्यामुळे तुम्हाला जर अतिरिक्त उत्पन्न हवे असेल तर या पर्यायाचा वापर करून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये आरामात मिळवू शकतात.
