TATA Capital IPO:- गेल्या किती दिवसापासून चर्चेत असलेला आणि गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकी करिता महत्त्वाचा असलेला टाटा समूहाचा टाटा कॅपिटल या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचा आयपीओ बाजारात येण्यासाठी सज्ज झाला असून तुम्हाला देखील यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकरिता देखील ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या IPO च्या माध्यमातून कंपनी 17200 कोटी रुपये उभारणार आहे. त्यामुळे या लेखात आपण या आयपीओचे वेळापत्रक बघणार असून जे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरेल.
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे वेळापत्रक
टाटा कॅपिटलचा बहुचर्चित आयपीओ आता बाजारात येण्यासाठी सज्ज झाला असून 6 ऑक्टोबर 2025 रोजी तो रिटेल गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीकरिता ओपन होणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे 3 ऑक्टोबर 2025 रोजी अँकर बोलीदारांसाठी हा खुला केला जाणार असून याची क्लोजिंग डेट म्हणजेच अंतिम गुंतवणुकीची तारीख 8 ऑक्टोबर 2025 आहे. यामध्ये एकूण 47.58 कोटी शेअर्स उपलब्ध असणार आहेत व यामध्ये जवळपास 21 कोटी पर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स असणार आहेत. इतकेच नाहीतर विद्यमान भागधारकांकडून ऑफर फॉर सेल अंतर्गत 26.58 कोटी पर्यंत शेअर्स असणार आहेत. ऑफर फॉर सेलमध्ये प्रमोटर्स टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड 23 कोटी शेअर्स विकणार आहे व आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ म्हणजेच आयएफसी 3.58 कोटींपेक्षा जास्तीचे शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहेत. या आयपीओची घोषणा झाल्यानंतर टाटा कॅपिटलच्या अनलिस्टेड शेअरच्या किमतीत मोठी घट झाली आहे. एप्रिलमध्ये 1125 रुपये असलेला हा शेअर 35 टक्के घसरला असून सध्या 735 किंवा 650 रुपया पर्यंत किंमत कमी झाली आहे.
