Whatsapp Alternate : 2014 मध्ये सत्तेची चावी आपल्या हातात घेणाऱ्या मोदी सरकारने सातत्याने देशात नवनवीन उपक्रम राबवले आहेत. शासनाच्या माध्यमातून नवनवीन योजनांच्या माध्यमातून तसेच उपक्रमांच्या माध्यमातून देशाच्या विकासात भर घालण्याचा प्रयत्न होतोय.
सरकारने आत्मनिर्भर भारत हे मिशन हातीघेतले आहे. या मिशन अंतर्गत स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान अलीकडेच अमेरिकेने भारतावर लावलेल्या टेरिफ नंतर आत्मनिर्भर भारत मिशनला चालना मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतवर जोर देत स्वदेशी एप्लीकेशन वापरण्याचे आवाहन सुद्धा केले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय टेक कंपनी Zoho चे एप्लीकेशन्स वापरण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान या कंपनीने व्हाट्सअप सारखेच एक नवीन मेसेजिंग आणि कॉलिंग ॲप डेव्हलप केले आहे. Arattai हे या नव्या एप्लीकेशनचे नाव असून आज आपण याबाबत डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
भारतीय टेक कंपनी झोहोने लाँच केलेले Arattai अँप्लिकेशन व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप चॅट्स, चॅनेल, स्टोरीज आणि ऑनलाइन मीटिंग्ज अशा वेगवेगळ्या फीचर्स सह लॉन्च करण्यात आले आहे.
हे ॲप्लिकेशन व्हाट्सअप ला टक्कर देणार आहे. स्वतः सरकारमधील मंत्र्यांकडून देखील एप्लीकेशन वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. स्वदेशी एप्लीकेशन वापरण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी आवाहन केले होते.
एप्लीकेशन बाबत कंपनीने असा दावा केला आहे की कमी नेटवर्क असेल तिथे सुद्धा हे ॲप्लिकेशन चांगल्या पद्धतीने वर्क करते. या नव्या एप्लीकेशन्समध्ये यूजर्स एकाहून एक चॅट, ग्रुप संभाषण आणि फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे किंवा व्हॉइस नोट्स सहज शेअर करू शकतात.
या अँपमध्ये कॉलिंगसाठी व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा चॅटबॉक्स मधूनच देण्यात आली आहे. यात ग्रुप डिस्कशन साठी चैनल आहेत. स्टोरीज ठेवण्याचे फीचर आहे. मीटिंग सुद्धा शेड्युल करता येतात. मीटिंगमध्ये यूजर्स को होस्ट जोडू शकतात.
महत्वाची बाब म्हणजे हे ॲप्लिकेशन वेगवेगळ्या डिवाइस वर वर्क करते. या एप्लीकेशनचे अपडेटेड वर्जन येत्या काही दिवसांनी लॉन्च होण्याची शक्यता असून यामुळे या ॲप्लिकेशनची सुरक्षितता आणखी वाढणार आहे.
तुम्हालाही एप्लीकेशन डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही एप्पल स्टोअरवरून किंवा प्लेस्टोर वरून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. तुम्ही जर अँड्रॉइड युजर असाल तर https://play.google.com/store/apps/details?id=com.aratai.chat या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.