India’s Longest Metro : देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सरकारकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत बनवली जात आहे. मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक नवीन उंची मिळाली आहे. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये आता मेट्रो सुरु झाली आहे.
महाराष्ट्रातही अनेक शहरांमध्ये मेट्रोची सेवा उपलब्ध आहे. मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली असून यामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट झालाय.

दरम्यान देशातील सर्वाधिक लांबीचा मेट्रोमार्ग सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच उभारला जातोय. हा मेट्रोचा मोठा प्रकल्प आपल्या मुंबईत तयार होतोय. MMRDA द्वारे या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे.
बदलापूर – कांजूरमार्ग असा हा संपूर्ण मार्ग राहणार आहे. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. प्राधिकरणाकडून खाजगी कंपन्यांसोबत हा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे.
यामुळे बदलापूर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जलद गतीने मुंबईत पोहोचता येईल. हा प्रकल्प पुढील 5 वर्षात पूर्ण होणार आहे. बदलापूर कांजूरमार्ग असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना लोकलने जावे लागते.
पण मेट्रो लाईन 14 लोकलवरील ताण कमी करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित प्रवास करता येणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या मार्गावरील लोकल प्रवास अधिक आव्हानात्मक बनतो.
काही वेळा लोकल मध्येच थांबते. पण मेट्रो सुरु झाल्यानंतर ही अडचण दुर होणार आहे. बदलापूर कांजूरमार्ग अशी 38 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गीका मुंबईकरांसाठी मोठी फायद्याची ठरणार आहे.
या नव्या लाईन मुळे दररोज सात लाख मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार आहे. विशेष म्हणजे खाडी ओलांडणारी ही मुंबईतील पहिलीच मेट्रो मार्गीका राहणार असा दावा करण्यात आलाय.
या प्रकल्पाचा डी पी आर नुकत्याच काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला आयआयटी मुंबई कडून मान्यता सुद्धा मिळाली आहे. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर विकसित होणार आहे.
यासाठीची टेंडर प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. एम एम आर डी ए या प्रकल्पावर काम करण्यासाठी खाजगी कंपन्यांचे मत जाणून घेणार आहे. यासाठी 28 जुलै ही शेवटची तारीख आहे.
या मुदतीत ज्या कंपन्यांचे प्रस्ताव सादर होतील त्या टेंडरची छाननी होणार आहे. पुढे यात पात्र ठरणाऱ्या कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले जातील. एमएमआरडीए कडून याचे टेंडर काढण्यात आले असले तरी देखील याचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे.
या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असून आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो.
देशातील सर्व मेट्रो मार्ग केंद्रीय नगर विकास मंत्रालय अंतर्गत येतात. यामुळे या प्रकल्पाबाबत केंद्र सरकारला सुद्धा माहिती दिली जाणार आहे.