ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra School : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही शाळांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा पाऊस पडतोय.
यामुळे अगदीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक हातातून गेलंय. अशातच आता कोकणातील जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय झाला आहे. पालघर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय.
पालघर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी कडक आदेश निर्गमित करत नागरिकांना अनावश्यक बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उद्याही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता संभाव्य धोका लक्षात घेऊन येथेही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. नदी-नाल्यांना पूर येण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत केंद्राशी त्वरित संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाल्याने दिलासा मिळणार आहे.