Post Office Scheme : पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना साडेआठ लाख रुपयांचा फंड जमा करता येणार आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनेमुळे गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला छोटी रक्कम जमा करून मोठा फंड जमा करू शकतात.
खरे तर पोस्टाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यामुळे जर तुम्हीही तुमचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी.

पोस्टाकडून असंख्य बचत योजना सुरू आहेत. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे आर डी योजना. रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.
ही योजना पाच वर्षांची असते. यामध्ये गुंतवणूकदारांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवता येते. यावर पोस्टकडून चांगले व्याज ही दिले जात आहे. खरेतर, ही योजना पूर्णतः सुरक्षित आहे.
यात करण्यात आलेली गुंतवणूक ग्राहकांना चांगले व्याज देत आहे. ह्या योजनेत प्रत्येक महिन्याला 5 हजार गुंतवून 8.5 लाखांचा फंड तयार होणार आहे. आता आपण याच बाबत माहिती पाहणार आहोत.
या योजनेत गुंतवणूकीची मर्यादा राहणार नाही. गुंतवणूकदारांना हवी तेवढी रक्कम ते यात गुंतवू शकतील. एखाद्याने यात दर महिन्याला 5 हजार रुपये गुंतवलेत तर 5 वर्षात 3 लाख 56 हजार 830 रुपये मिळणार आहेत.
यात गुंतवणूक दाराची गुंतवणूक 3 लाख रुपये राहणार. तसेच या जमा रकमेवर 56 हजार 830 रुपये व्याज मिळणार आहे. आता तुम्हाला यातून अधिक लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही अजून पाच वर्षासाठी गुंतवणूक करायला हवी.
असे केल्यास तुम्हाला 8 लाख 54 हजार 272 रुपये मिळणार आहेत. यात तुमची गुंतवणूक 6 लाख रुपये राहणार आहे. तसेच या जमा रकमेवर तुम्हाला 2 लाख 54 हजार 272 रुपये व्याज मिळणार आहे.
अर्थातच 10 वर्षानंतर तुम्हाला 8 लाख 54 हजार 272 रुपये मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याला छोटी रक्कम गुंतवून तुम्ही मोठा निधी उभारू शकता.