State Employee News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरेतर, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्यात धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालय. राज्यातील नागरिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केलीये.
अशातच आता पुरग्रस्तांना आणखी एक गुड न्यूज समोर आलीये. त्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकांनी पुढाकार घेतलाय.

खरे तर आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पगारातील काही भाग मदत म्हणून देण्यात येणार आहे. राज्यातील विविध कर्मचारी संघटना व राजकीय पक्षांनी आता सरकारला सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे.
राजपत्रित अधिकारी संघटनेने याबाबत सरकारकडे निवेदन सुद्धा सादर केले आहे. संघटनेने तब्बल दीड लाख अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांना देण्याची तयारी दाखवली असून एका दिवसाच्या पगारात कपात करण्याबाबत अधिकृत निवेदन राज्य सरकारला सादर केले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मदत मिळणार आहे. संकटाच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरेल.
याशिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनी देखील आपल्या एक दिवसाच्या पगारातून मदत करण्याची परवानगी दिली आहे.
या निर्णयामुळे पुरग्रस्तांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकणार आहे. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी राज्यातील सर्व शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करून ते पुरग्रस्तांसाठी मदत निधीत जमा करण्यात येईल अशी घोषणा केली आहे.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी संकट काळात दाखवलेली संवेदनशीलता समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पगारातून म्हणजेच जो पगार ऑक्टोबर मध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारातून एका दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे.
विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होणारा निधी थेट शासनाकडे जमा होऊन शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत पोहोचवली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
आपत्तीच्या काळात समाजातील सर्व स्तरांनी आता पुढे येणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी याची सुरुवात सुद्धा केली आहे. समाजातील इतर घटकातील नागरिकांनी सुद्धा पूरग्रस्तांसाठी त्यांच्याकडून जशी होईल तशी मदत करणे आवश्यक आहे.