UPI Payment : फोन पे, गुगल पे, पेटीएम सारख्या पेमेंट एप्लीकेशनमुळे UPI व्यवहाराला चालना मिळाली आहे. खरे तर आपल्यापैकी अनेक जण युपीआयने पेमेंट करत असतील. दरम्यान जर तुम्हीही यूपीआयने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.
डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना आता आणखी एका नव्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. एन पी सी आय अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून युनिफाईड पेमेंट इंटरफेसने पेमेंट करणाऱ्या व्यक्तींसाठी ईएमआयचा ऑप्शन उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अर्थात आता यूपीआय वापरणाऱ्यांकडे क्रेडिट कार्ड नसले तरीसुद्धा त्यांना क्रेडिट कार्ड सारखा फायदा मिळणार आहे. मोठ्या खरेदीसाठी आता यूपीआय वापरणाऱ्यांना हप्त्यांमध्ये पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
नक्कीच हा निर्णय डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना फायद्याचा ठरणार असून यामुळे UPI एक पूर्णपणे क्रेडिट इकोसिस्टम म्हणून उदयास येणार आहे. हा निर्णय फक्त ग्राहकांच्या फायद्याचा राहील असेही नाही.
यामुळे फिनटेक कंपन्या आणि बँकांच्या विस्ताराला चालना मिळणार आहे. NPCI ने या नव्या सुविधेबाबत थोडी माहिती दिली आहे. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार या नव्या फॅसिलिटीजमुळे ग्राहकांना क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करताना EMI मध्ये पेमेंट करण्याचा पर्याय मिळणार आहे.
क्रेडिट कार्ड धारक ज्या पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करतात तशीच ही सुविधा राहणार आहे. अद्याप फिनटेक कंपन्यांनी ही सुविधा सुरू केलेली नाही. पण येत्या काळात ही सुविधा सुरू होणार आहे.
Paytm आणि Navi सारख्या फिनटेक कंपन्या आधीपासूनच आपल्या ग्राहकांना अशा प्रकारची सुविधा देतात. वास्तविक या कंपन्या बँकांसोबत मिळून क्रेडिट लाइन ऑफर करत आहेत.
आता भविष्यात ही सुविधा सुरू झाली तर या कंपन्यांचा व्यवसाय आणखी वाढणार आहे. ही नवीन सुविधा ग्राहकांना मोठ्या खरेदीसाठी मदत करणार आहे. त्याचवेळी यामुळे फिनटेक कंपन्यांसाठी नव्या कमाईचा मार्ग सुद्धा खुला होईल.
कारण आज रोजी UPI तसेच RuPay डेबिट कार्डवर कोणताही चार्ज लागत नाही. पण क्रेडिट पेमेंट्सवर सुमारे 1.5% इंटरचेंज फी आकारली जाईल असा अंदाज दिला जातोय.
या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे या नव्या सुविधेमुळे ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, त्यांनाही आता Buy-Now-Pay-Later सारख्या मॉडेल्सचा फायदा घेता येईल. तसेच UPI फक्त पेमेंटचे साधन राहणार नाही तर एक संपूर्ण पेमेंट सिस्टीम म्हणून ओळखले जाणार आहे.