Small Business Idea : तुम्हीही नऊ ते पाच अशी नोकरी करून कंटाळला आहात का मग तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा एका बिजनेसची माहिती सांगणार आहोत ज्यातून तुम्ही प्रत्येक महिन्याला हजारो रुपयांची कमाई करू शकता.
या व्यवसायातून तुम्ही महिन्याकाठी 50 हजार रुपयांपर्यंतची कमाई करू शकणार आहात. महत्त्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय तुम्ही फक्त 25000 रुपयांच्या एका मशीनच्या माध्यमातून सुरु करू शकता. आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय.

आजचा हा काळ ट्रेंड फॉलो करण्याचा आहे. बाजारात दररोज नवनवीन ट्रेंड सेट होत असतात. असाच एक नवा ट्रेंड आता सुरू आहे आणि तो ट्रेंड म्हणजे कस्टमर टी-शर्ट घालण्याचा. नवयुवक तरुण-तरुणी कस्टमाईज टी-शर्ट घालण्यास पसंती दाखवतात.
अशा स्थितीत जर तुम्ही हा बिजनेस सुरू केला तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा मिळणार आहे. टी-शर्ट प्रिंटिंग चा बिजनेस तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुरू करू शकता. एकाच वेळी तुम्ही तुमचा बिजनेस दोन्ही प्लॅटफॉर्मवर नेऊ शकता आणि यातून चांगली कमाई सुद्धा करू शकता.
तुम्ही सुरुवातीला तुमचा बिजनेस ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन शॉपिंग साईटवरून सुरु करा. जेव्हा तुमचा व्यवसाय ग्रो होईल तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची एक वेबसाईट तयार करून तुमच्या व्यवसायाला नवे स्वरूप देऊ शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फार इन्व्हेस्टमेंट करावी लागणार नाही. साधारणता 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला एक छोटासा गाळा घ्यावा लागणार आहे.
तुम्ही ज्या शहरात राहता तिथे तुम्ही भाडेतत्त्वावर एक छोटा गाळा घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुमचे घर मार्केटमध्ये असेल तर तुम्ही घरातून सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला एक छोटेसे मशीन खरेदी करावे लागणार आहे.
टी-शर्ट प्रिंटिंगचे हे मशीन बाजारात तुम्हाला अंदाजे 25 ते 30 हजार रुपयांमध्ये उपलब्ध होईल. याशिवाय तुम्हाला कच्चामाल म्हणून टी-शर्ट खरेदी करावे लागणार आहेत. होलसेलर कडून तुम्ही प्लेन टी-शर्ट खरेदी करून त्यावर तुमच्या क्रिएटिव्ह माईंडने कस्टमाईजेशन करू शकता.
अन्यथा तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांना कस्टमर टी-शर्ट तयार करून देऊ शकता. हा व्यवसाय तुम्हाला छोटा वाटत असेल पण जर तुम्ही एका महिन्याला 500 टी-शर्ट विकले तर तुम्हाला साधारणता पन्नास हजार रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.
तुम्हाला जर फक्त तुमच्या ग्राहकांना प्रिंटिंगची सुविधा उपलब्ध करून द्यायची असेल तर तुम्ही एका टी-शर्ट प्रिंटिंग साठी 100 ते 200 रुपये चार्ज करायला काही हरकत नाही.
पण चार्जेस ठरवताना तुम्ही तुमच्या लोकेशनची आणि इतर गोष्टींची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. मेट्रो शहरांमध्ये तुम्हाला दुकानासाठी अधिकचे रेंट द्यावे लागणार आहे यामुळे चार्जेस ठरवताना या गोष्टीचे भान ठेवा आणि त्यानुसारच तुमच्या सेवेचे चार्जेस ठरवा.













