Split Stock : गेल्या काही वर्षांपासून भू – राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे चिंतेत आहेत. दरम्यान आता गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच एका बड्या डिफेन्स कंपनीचा स्टॉक स्प्लिट करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कंपनीचा स्टॉक आज पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे.
डिफेन्स कंपनी बीईएमएल लिमिटेडने आपल्या स्टॉकचे दोन भागात विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून याची रेकॉर्ड डेट सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. खरेतर या कंपनीने नुकत्याच काही दिवसापूर्वी आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर केला आहे.

सप्टेंबर महिन्यात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति स्टॉक 1.20 रुपये लाभांश जाहीर करण्याची घोषणा केली होती. डिव्हीडंट देण्याच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला होता. दरम्यान त्याआधी मे महिन्यात कंपनीने पंधरा रुपये प्रत्यक्ष डिव्हीडंड दिला होता.
त्यावेळी कंपनीचे स्टॉक चांगलेच तेजीत आले होते. आता कंपनीने स्टॉक Split ची घोषणा केली आहे. यामुळे पुन्हा एकदा या स्टॉकच्या किमतीत थोडी तेजी आली आहे. BEML लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला काल 29 सप्टेंबर रोजी स्टॉक स्प्लिट बाबत महत्त्वाची माहिती दिली.
डिफेन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी बीईएमएल लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. आता ह्या स्प्लिटनंतर या कंपनीच्या प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 5 रुपये इतकी होणार आहे.
गुंतवणूकदारांसाठी कंपनीने घेतलेला हा निर्णय फारच महत्त्वाचा राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने एक्सचेंजला याच्या रेकॉर्ड बाबतही सांगितले. स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 3 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अशा स्थितीत आता आपण या कंपनीच्या स्टॉकची शेअर मार्केट मधील स्थिती कशी आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आज हा शेअर 4084.70 रुपयांवर ओपन झाला. आतापर्यंत हा स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह तो 4147.20 रुपयांवर पोहोचला आहे. या बड्या डिफेन्स कंपनीचे मार्केट कॅप 17,166.70 कोटी रुपये इतके आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4874.85 रुपये तर नीचांक 2346.35 रुपये आहे.
मागील 5 वर्षात कंपनीने किती रिटर्न दिलेत?
सहा महिन्यांत – 28%
एका वर्षात – 12%
2 वर्षात – 77%
5 वर्षात – 177%