GST On Cars : केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच जीएसटी 2.0 ची अंमलबजावणी सुरू केली आहे. याचा परिणाम म्हणून चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्यांची किंमत कमी झाली आहे. दरम्यान जर तुम्हाला येत्या काही दिवसांनी नवीन गाडी खरेदी करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे.
ज्यांना सनरुफ असणारी गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. छोट्या गाड्यांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय.

खरंतर छोट्या गाड्यांवरील जीएसटी आता 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आली आहे. यामुळे अनेक ऑटो कंपन्याच्या कार्स स्वस्त झाल्या आहेत. या निर्णयामुळे सनरुफ असणारी कार सुद्धा आता स्वस्त झालीये.
जीएसटीचे नवीन रेट 22 सप्टेंबर पासून लागू झाले आहेत. मोदी सरकारचा हा निर्णय एक मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिला जातोय. या निर्णयामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय.
दरम्यान जर तुम्हाला सनरूफ असणारी गाडी खरेदी करायची असेल तर ही वेळ तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. आता Sunroof असणाऱ्या काही गाड्या फक्त 7 -8 लाखात मिळत आहेत. दरम्यान आता आपण कमीकिमतीच्या सनरूफ वाल्या टॉप 5 गाड्यांची माहिती पाहणार आहोत.
या आहेत टॉप 5 कार्स
किया सोनेट – ही SUV वेन्यूसारखीच दिसते. ह्या गाडीचा आकार सुद्धा तसाच आहे. पण तिच्या HTE (O) ट्रिममध्ये सनरूफ उपलब्ध आहे. ही गाडी डिझेल इंजिनमध्ये पण आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.7 लाख आहे.
ह्युंडाई वेन्यू – स्वस्तात सनरुफ असणारी कार घ्यायची असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. या गाडीच्या E+ ट्रिमपासून तुम्हाला सनरूफ मिळतोय. पण या व्हर्जनमध्ये फक्त 1.2 लिटर पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.61 लाख आहे.
टाटा अल्ट्रोज – या हॅचबॅकचे नुकतेच फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्यात आले आहे. यामुळे आता Pure S ट्रिमपासून सनरूफ दिला जातोय. यात 1.2 लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. याची एक्स शोरूम किंमत 7. 36 लाख आहे.
ह्युंडाई एक्सटर – ही कंपनीची सर्वात लहान SUV आहे. याच्या S+ ट्रिमपासून सनरूफ उपलब्ध करून देण्यात आले आहे. खास म्हणजे या मॉडेलमध्ये व्हॉइस कमांडद्वारे सनरूफ ऑपरेट करण्याची सोय पण आहे. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. तसेच CNG पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. गाडीची एक्स शोरूम किंमत 7.3 लाख आहे.
टाटा पंच – GST कपातीचा निर्णय झाल्यानंतर ही गाडी देशातील सर्वात स्वस्त सनरूफ असलेली कार बनली आहे. तिच्या अॅडव्हेंचर S ट्रिमपासून ही सुविधा मिळते. यात 1.2 लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. तसेच याचे CNG व्हर्जन देखील मिळते. याची एक्स शोरूम किंमत 7.06 लाख आहे.