Maruti Upcoming Cars : नव्याने कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय कार मार्केट मध्ये लवकरच मारुती सुझुकी आपल्या तीन नवीन मॉडेल सादर करणार आहे. खरे तर सरकारने 22 सप्टेंबर पासून जीएसटी चे नवे धोरण लागू केला आहे.
या नव्या धोरणामुळे छोट्या गाड्यांच्या किमतीत मोठी कपात झालीये. कारण की चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्यांवरील जीएसटी सरकारकडून कमी करण्यात आला आहे. त्याचा परिणाम थेट गाड्यांच्या किमतीवर झालाय आणि सर्वसामान्यांना या निर्णयाचा मोठा फायदा मिळतोय.

दरम्यान आता सरकारचे जीएसटी धोरण लागू झाल्यानंतर ज्या नव्या गाड्या लॉन्च होतील त्यांच्याही किमती कमी राहणार आहेत. अशातच आता मारुती सुझुकीकडून एक मोठी गुड न्यूज समोर आलीये. देशातील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी अर्थात मारुती सुझुकी येत्या काळात 3 नवीन कार्स लॉन्च करणार आहे.
खरेतर, कंपनीने नुकतीच आपली नवी SUV विक्टोरिस लॉन्च केलीये. आता कंपनी 2026-2027 दरम्यान आणखी काही दमदार गाड्या लॉन्च करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आलंय.
मारुति फ्रॉन्क्स हायब्रिड – कंपनी स्वतःची HEV सीरिज हायब्रिड टेक्नॉलॉजी आणत आहे. या तंत्रज्ञानावर आधारित पहिली गाडी फ्रॉन्क्स राहील. या गाडीमध्ये 1.2-लीटर Z12E पेट्रोल इंजिन देण्यात येईल व हायब्रिड सिस्टीम सुद्धा राहणार आहे. ही गाडी पुढील वर्षी लॉन्च होणार आहे.
मारुति e-विटारा – कंपनीची ही पहिलीच इलेक्ट्रिक SUV राहणार आहे. यामुळे ग्राहक या गाडीची आतुरतेने वाट पाहत आहेत. गुजरातमधील हंसरपूर प्लांटमध्ये याचे उत्पादन सुद्धा सुरू झालय. आधी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही गाडी लॉन्च करण्यात येईल असा अंदाज समोर आला होता. पण आता ही गाडी 2026 च्या सुरुवातीला बाजारात लाँच केली जाईल असा अंदाज देण्यात आलाय. ही गाडी एका चार्जवर जवळपास 500 किलोमीटरची रेंज देणार आहे.
नवी 7-सीटर SUV – कंपनी प्रीमियम सेगमेंट मध्ये नवीन सेवन सीटर कार लॉन्च करणार आहे. ही गाडी थेट महिंद्रा XUV700, हुंडई अल्काझार सारख्या प्रीमियम गाड्यांसोबत स्पर्धा करताना दिसेल. या गाडीची लांबी 4.5 मीटरपेक्षा जास्त राहणार असल्याने नवीन जीएसटी धोरणाचा याला फायदा होणार आहे. या SUV ची लॉन्चिंग 2027 पर्यंत होणार आहे.