‘या’ कंपनीच्या एका शेअरवर मिळणार 3 बोनस शेअर ! गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच होणार चांदी, रेकॉर्ड डेट आत्ताच लिहून ठेवा

Published on -

Bonus Share : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी बोनस शेअर्सवर डोळा ठेवून बसलेल्या गुंतवणूकदारांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की  मार्केटमध्ये लिस्टेड एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली असून याची रेकॉर्ड डेट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.

स्टॉक एक्सचेंज कडून मिळालेल्या माहितीनुसार सयाजी इंडस्ट्रीजने दिवाळीच्या आधीच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेट दिली आहे. नक्कीच ही बातमी बोनस शेअर्स जारी करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असणाऱ्या लोकांसाठी खास ठरणार आहे.

खरेतर या कंपनीने याआधी सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतलेत. कंपनीने तीन वर्षांपूर्वी आपल्या गुंतवणूकदारांसाठी डिव्हीडंट दिले होते. 2022 मध्ये कंपनीने प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना 1 रुपये लाभांश दिला होता. तसेच सात वर्षांपूर्वी स्टॉक स्प्लिट केले होते.

त्या वेळी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचा शेअर विभागून त्याची फेस व्हॅल्यू 5 रुपये प्रति शेअर करण्यात आली होती. दरम्यान आता या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सयाजी इंडस्ट्रीज लिमिटेडने पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स जाहीर केले आहेत.

कंपनीने आधी डिव्हीडंट दिला आहे. पण बोनस शेअर देण्याची ही कंपनीची पहिलीच वेळ आहे आणि म्हणूनच या कंपनीचा स्टॉक आता पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. कंपनी यावेळी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर तीन बोनस शेअर देणार आहे.

थोडक्यात ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे 1000 शेअर्स असतील त्यांना अतिरिक्त 3000 शेअर्स बोनस स्वरूपात कंपनीकडून दिले जाणार आहेत. या बोनस इश्यूचा ट्रेड नेमका कधी होईल? याची रेकॉर्ड डेट काय असेल? याबाबतही कंपनीकडून सविस्तर तपशील सादर करण्यात आला आहे.

कंपनीने बोनस शेअर्स साठी 7 ऑक्टोबर हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. या दिवशी कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस ट्रेड होणार आहेत. यामुळे कंपनीच्या शेअरहोल्डर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी राहिली आहे.

हा स्टॉकला आज अपर सर्किट लागले होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आज या स्टॉकच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्यात. शेअरची किंमत 297.80 रुपयांवर पोहोचली. खरंतर या स्टॉकने गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 187% रिटर्न दिलेत. तसेच गेल्या एका वर्षात 34% रिटर्न दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe