Post Office च्या ‘ह्या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास दरमहा मिळणार 20 हजार 500 रुपयांचे व्याज !

Published on -

Post Office Scheme : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्यूअल फंडमध्ये अनेकजण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना चांगला पैसा सुद्धा मिळतोय. पण आजही काही लोक पारंपारिक गुंतवणुकीच्या पर्यायांना पसंती दाखवतात. पारंपारिक गुंतवणुकीमध्ये बँकांच्या एफडी योजना व पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना अधिक महत्त्व दाखवले जाते.

रिटर्न कमी मिळालेत तरी चालेल पण आपला पैसा पूर्णपणे सुरक्षित हवा अशी धारणा अनेकांची असते. दरम्यान जर तुम्हालाही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या बचत योजना फायद्याच्या ठरणार आहे. खरे तर पोस्ट ऑफिसच्या असंख्य योजना सुरू आहेत.

यामुळे गुंतवणूकदार नेमक्या कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी याबाबत नेहमीच संभ्रमात असतात. त्यामुळे आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर सलग पाच वर्ष गुंतवणूकदारांना दरमहा वीस हजार रुपये व्याज मिळत राहणार आहे.

म्हणजे पोस्टाच्या या योजनेत एकदा गुंतवणूक केली की नोकरी सारखा पैसा मिळेल. आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत त्याला सीनियर सिटीजन सेविंग स्कीम या नावाने ओळखले जाते. ही योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जात असून यामध्ये गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित असतो.

पण या योजनेत सर्वच नागरिकांना गुंतवणूक करता येत नाही. या ठिकाणी फक्त सिनिअर सिटीझन ग्राहकांनाच गुंतवणूक करता येते. 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून याचा आतापर्यंत अनेकांनी लाभ घेतला आहे. अनेक सीनियर सिटीजन ग्राहकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. 

कसे मिळणार 20 हजार रुपयांचे व्याज?

सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 8.2% दराने व्याज दिले जाते. ही पाच वर्षांची योजना आहे. आधी या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येत होती. पण मध्यंतरी सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी यात 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा दिली.

त्यानुसार जर एखाद्या नागरिकाने यात तीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दरमहा वीस हजार पाचशे रुपयांचे व्याज मिळणार आहे. म्हणजे या योजनेत सिनिअर सिटीजन ग्राहकांना जास्तीत जास्त 2.46 लाख रुपये वार्षिक व्याज मिळते.

नक्कीच जर तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावे एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी या योजनेचा पर्याय सर्वात बेस्ट राहणार आहे. यात गुंतवलेल्या रकमेवर कोणतेही कर द्यावे लागत नाहीत. पण योजनेतून मिळणारे व्याज हे करपात्र असते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe