New Smartphone : अलीकडेच अँप्पलने आयफोन 17 सिरीज लॉन्च केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एप्पल यावेळी Iphone 17 Air सुद्धा लाँच केला आहे. दरम्यान आता आयफोनला टक्कर देण्यासाठी मोटोरोला लवकरच बाजारात एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरे तर एप्पलने लॉन्च केलेला नवीन आयफोन 17 एअर हा फारच स्लिम आहे.
यामुळे हा फोन लॉन्च झाल्यापासून चर्चेत आहे. पण या आयफोनला ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. अनेकांनी iPhone Air फायद्याचा नसल्याचे सांगितले. आयफोन मध्ये देण्यात आलेली बॅटरी ही सर्वसामान्यांना परवडणारी नाहीये. अशातच आता मोटोरोला लवकरच आपला नवीन Moto X70 Air नावाचा स्लिम स्मार्टफोन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

नुकतेच कंपनीने आपल्या Weibo हँडलवरून या फोनचा टीझर इमेज सुद्धा शेअर केलाय. यामुळे मोटोच्या या अपकमिंग फोनची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. कंपनीने टीजर जारी करताना नव्या फोनच्या डिझाइनची झलक दाखवलीये. यामुळे ग्राहक फारच उत्साही आहेत. हा मोटोचा अपकमिंग स्मार्टफोन थेट Apple iPhone Air आणि Samsung Galaxy S25 Edge ला टक्कर देणार अशाही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. खरे तर एप्पल च्या आधी सॅमसंगने Galaxy S25 Edge हा स्मार्टफोन लॉन्च केला.
सॅमसंगचा हा अलीकडेच लॉन्च झालेला स्मार्टफोन देखील कंपनीचा सर्वाधिक स्लीम स्मार्टफोन म्हणून ओळखला जातोय. आता मोटोरोला देखील आपला नवा स्लिम फोन बाजारात आणणार आहे. हा सुद्धा कंपनीचा एक स्लिम व प्रीमियम फोन राहणार आहे. रिपोर्टनुसार, Moto X70 Air ची जाडी 5.6 मिमी ते 5.8 मिमी दरम्यान असू शकते. थोडक्यात एप्पल आणि सॅमसंग प्रमाणेच मोटो सुद्धा स्लिम फोन बनवणार आहे. हा फोन जगातील सर्वात स्लीम स्मार्टफोनपैकी एक राहणार आहे. नव्या फोनमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट दिला जाईल.
त्यामुळे या स्मार्टफोनचा लूक व परफॉर्मन्स दमदार असेल. मोटोरोलाचा नवा फोन ग्रीन कलर ऑप्शनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे याची लॉन्चिंग डेट सुद्धा आता समोर येत आहे. हा अपकमिंग स्मार्टफोन सुरुवातीला चीनमध्ये येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात याची चीनमध्ये लॉन्चिंग होईल आणि त्यानंतर मग भारतात हा फोन लॉन्च करण्यात येणार आहे. ऑक्टोबर मध्ये कोणत्या तारखेला हा फोन लॉन्च होणार याची तारीख अजून समोर आलेली नाही. पण लवकरच तारखेबाबतही कंपनीकडून घोषणा करण्यात येणार आहे. चीनमध्ये लॉन्च झाल्यानंतर भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये हा फोन इंट्री करणार आहे.