मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पुन्हा मोठा झटका ! CM फडणवीस यांनी पुन्हा नियमात केला मोठा बदल

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंतचा लाभ मिळाला आहे. ऑगस्टचा हप्ता हा सप्टेंबर मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून सप्टेंबरचा हप्ता आता या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पात्र महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. अशी सगळी परिस्थिती असतानाच आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलय. महायुती सरकारने लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे.

लाडक्या बहिणींना पुन्हा एक मोठा फटका बसलाय. सरकारने आता या योजनेच्या नियमात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल केलाय. जसं की आपणास ठाऊकच आहे की सरकारने या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याची बाब समोर आल्यानंतर पडताळणीची प्रक्रिया सुरू केली होती.

पडताळणीत अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी याचा लाभ घेतला असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर मग या योजनेच्या अपात्र महिलांचा लाभ थांबवण्यासाठी सरकारने केवायसीची प्रक्रिया सक्तीची केली आहे.

दरम्यान आता लाभार्थी महिला सोबतच तिच्या पतीची किंवा वडिलांची सुद्धा केवायसी करावी लागणार असल्याचा नवा नियम फडणवीस सरकारने लागू केला आहे. खरे तर या योजनेचा लाभ फक्त अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना दिला जातो.

पण अनेक महिला अशा आहेत ज्यांनी अधिक उत्पन्न असताना सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे. दरम्यान याचाच शोध घेण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत, नवनवीन नियम लागू केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्याचा एक मोठा निर्णय सरकारने घेतला.

दरम्यान आता या योजनेच्या लाभार्थी महिलांसोबतच तिच्या वडिलांची किंवा पतीची केवायसी करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी सोबतच लाभार्थी महिलेच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न सुद्धा तपासले जाणार आहे.

रिपोर्टनुसार लाडक्या बहिणीच्या उत्पन्नासोबतच आता त्यांचे वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असेल तर अशा महिलेला योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. लाभार्थी अविवाहित असेल तर तिच्या वडिलांच्या उत्पन्नाचे चौकशी करण्यात येणार आहे. जर विवाहित असेल तर तिच्या नवऱ्याच्या उत्पन्नाची चौकशी करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News