DA Hike : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी दसरा-दिवाळीच्या आधीच एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने अखेरकार सरकारी कर्मचाऱ्यांचा व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये महागाई भत्ता बाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला होता यामुळे यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार हा मोठा सवाल पण उपस्थित होत होता.

एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार यावेळी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होणे जवळपास फिक्स होते. पण तरीही याबाबतचा अंतिम निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळालाच घ्यायचा होता.
त्यानुसार आता केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वरून 58 वर पोहोचला असून ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे.
या निर्णयाचा देशभरातील 48 लाख शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 68 लाख केंद्रीय पेन्शनधारकांना फायदा होणार असल्याची माहिती सरकारकडून समोर आली आहे.
वाढीव महागाई भत्ता एक जुलै 2025 पासून लागू राहणार असून याचा प्रत्यक्षात लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळणार आहे.
जुलै 2025 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. दसरा – दिवाळीच्या आधीच केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला असल्याने याचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम व वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. या आर्थिक लाभांमुळे यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा होणार अशी आशा आहे.
महागाई भत्ता वाढीच्या निर्णयानंतर 30 हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त 900 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. अर्थात या कर्मचाऱ्यांचा पगारात 900 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर विचार केला असता पगारात तब्बल दहा हजार आठशे रुपयांची वाढ होईल.