Smartphone Discount : तुम्हाला नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. खरे तर सध्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन दोन्ही लोकप्रिय शॉपिंग साइटवर सेल सुरू आहे. अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू आहे तर दुसरीकडे फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सुरू करण्यात आली आहे.
पण फ्लिपकार्ट वर सुरू असणारे ऑफर आता जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येथील Big Billion Days Sale येत्या काही दिवसांनी संपेल. दरम्यान जर तुम्हाला एखादा नवीन दमदार कॅमेऱ्याचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टच्या या सेलचा फायदा घ्यायला हवा.

कारण की फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा असणारा Redmi चा फोन फक्त 20,000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. दमदार कॅमेरा व आकर्षक डिझाइनसाठी ओळखला जाणारा Redmi Note 13 Pro 5G या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ग्राहकांना कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.
आतापर्यंत अनेकांनी या सेलमधून हा फोन खरेदी केला आहे. जर तुम्हालाही आपण खरेदी करायचा असेल तर तुम्ही फक्त 19 हजार 999 रुपयांना हा फोन फ्लिपकार्ट मधून खरेदी करू शकता. पण स्टॉक मर्यादित असल्याने ही ऑफर सेल संपेपर्यंतच उपलब्ध राहणार आहे.
रेडमीच्या या स्मार्टफोन मध्ये कंपनीने 200MP क्षमतेचा कॅमेरा सेटअप दिला आहे. कंपनीने कमी बजेटमध्ये चांगला दमदार कॅमेरा दिलाय म्हणून ग्राहकांकडून या फोनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेषता तरुणांकडून या मोबाईलला भरभरून प्रेम दिले जात आहे.
या नव्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने EIS व OIS सपोर्टसह इन-सेंसर 4x झूम सुद्धा दिलाय. डिस्प्लेसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा दिली आहे, ज्यामुळे हा फोन टिकाऊ ठरतो. प्रीमियम प्रो-ग्रेड डिझाइनसह हा स्मार्टफोन ग्राहकांना आकर्षित करत आहे. फ्लिपकार्टवर हा फोन 19,999 रुपये या सुरुवातीच्या किमतीत लिस्ट करण्यात आला आहे.
निवडक बँक ऑफर्समुळे किंमत आणखी कमी होऊ शकते. याशिवाय एक्सचेंज डिस्काउंटद्वारे जुना फोन बदलूनही ग्राहक बचत करू शकतात. विशेष म्हणजे, Croma प्लॅटफॉर्मवरही हा फोन त्याच किमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे जर फ्लिपकार्ट वर तुम्हाला हा फोन मिळाला नाही तर तुम्ही क्रोमावर सुद्धा जाऊ शकता.