New Seven Seater Car : भारतात सेव्हन सीटर कारला मोठी मागणी असते. यामुळे अनेक ऑटो कंपन्यांनी सेवन सीटर कार लाँच केल्या आहेत. दरम्यान आता निसान कंपनी सुद्धा नवीन सेवन सीटर कार लॉन्च करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
भारतात आजही मोठे कुटुंब आहेत आणि यामुळे लोक सेवन सीटर गाड्या खरेदी करण्याला प्राधान्य देतात. दरम्यान जर तुमचाही नवीन 7 सीटर गाडी घ्यायचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी निसान कंपनीची अपकमिंग गाडी फायद्याची ठरणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे निसान कंपनीची ही अपकमिंग गाडी ह्युंदाई क्रेटा सोबत स्पर्धा करणार आहे. यामुळे या गाडीची चर्चा होणे स्वाभाविक आहे. ह्युंदाई क्रेटा ही देशातील एक टॉप क्लास अन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय गाडी आहे.
आता याच गाडीला टक्कर देण्यासाठी निसान मोटर्स लवकरच भारतीय बाजारात नवीन कार लॉन्च करणार आहे. महत्वाची बाब म्हणजे कंपनीचे हे नवीन मॉडेल लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. 7 ऑक्टोबर रोजी कंपनी नवी C-SUV पहिल्यांदा जागतिक स्तरावर शोकेस करणार आहे.
या वर्षात ही गाडी शोकेस केली जाईल व पुढील वर्षी ही गाडी अधिकृतरित्या विक्रीसाठी लॉन्च करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे या गाडीचा टीजर नुकताच लॉन्च करण्यात आला असून यातून गाडीची झलक समोर आली आहे. ही गाडी रस्त्यावर टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसली आहे.
या गाडीचे डिझाइन रेनॉल्ट डस्टरपेक्षा वेगळे असणार आहे. मात्र तिचा प्लॅटफॉर्म, साईज आणि इंजिन पर्याय डस्टरप्रमाणेच असतील. सर्वात खास बाब म्हणजे टॉप व्हेरिएंटमध्ये तीन स्क्रीन असलेला डॅशबोर्ड सेटअप मिळणार आहे, ज्यामुळे कारचा इंटिरिअर अधिक आधुनिक व प्रीमियम भासेल.
या SUV मध्ये पेट्रोल आणि पेट्रोल-हायब्रिड असे दोन इंजिन पर्याय उपलब्ध होणार आहेत. हेच पर्याय नेक्स्ट जनरेशन डस्टरमध्येही असणार आहेत. या गाडीची हुंडई क्रेटा, किआ सेल्टोस मारुती विक्टोरिस सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा राहणार आहे. निसान कंपनीसाठी ही गाडी फारच महत्वाची मानले जात आहे.
मागील वर्षभरात कंपनीने कोणतीच मोठी SUV लॉन्च केलेली नाही. यामुळे ही नवीन SUV चर्चेत राहणार आहे. तसेच कंपनी आणखी एक 7-सीटर MPV व 2027 पर्यंत एक इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच करणार आहे.
SUV सेगमेंटमध्ये आधीपासूनच मोठे कॉम्पिटिशन आहे. आता निसानची नवीन C-SUV लॉन्च होणार म्हणून या गाडीला ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहण्यासारखे राहील.