GST कपातीमुळे ग्राहकांची चांदी ! ह्युंदाई कंपनीची ‘ही’ गाडी बनली देशातील सर्वाधिक स्वस्त Sunroof असणारी कार 

Published on -

Hyundai Car : प्रत्येक मध्यमवर्गीयाचे स्वप्न असते की त्याच्याकडे एक हक्काची कार असावी. आपल्याकडे असणाऱ्या कारमध्ये आधुनिक विचार असावेत. पण आधुनिक फीचर्स असणारी कार खरेदी करण्यासाठी तेवढा पैसा सुद्धा खर्च करावा लागतो.

पण आता सनरुफ सारखे आधुनिक फीचर सुद्धा स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर सनरुफ असणाऱ्या गाड्यांच्या किमती पण कमी झाल्या आहेत.

दरम्यान आज आपण देशातील सर्वाधिक स्वस्त Sunroof वाली गाडीबाबत माहिती पाहणार आहोत. GST 2.0 लागू झाल्यानंतर ह्युंडई मोटर्सची Hyundai Exter सर्वात स्वस्त सनरूफवाली SUV बनलीये. Exter ही कंपनीची एक लोकप्रिय कार आहे. आता जीएसटी कपातीच्या निर्णयामुळे ही गाडी स्वस्त झाली आहे.

या गाडीचे S Smart व्हेरियंट आता ग्राहकांना 7.03 लाख रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध झाल आहे. या किमतीमुळे ही गाडी सनरूफ असलेल्या श्रेणीत देशातील सर्वात स्वस्त SUV बनली आहे. ह्युंडई Exter चे बेस व्हेरिएंट 5.49 लाख रुपयांना आहे. पण सनरूफचे S Smart व्हेरियंट 7.03 लाख रुपयांना मिळत आहे.

यामुळे जर तुम्हाला कमी किमतीत सनरूफ असणारी गाडी घ्यायची असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. या गाडीला 1.2 लिटर Kappa पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 81.8 बीएचपी पॉवर व 113.8 एनएम टॉर्क निर्माण करते. गाडी मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह बाजारात उपलब्ध आहे.

गाडीच पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 19.4 चे मायलेज देण्यास सक्षम आहे. तर CNG व्हेरिएंट तब्बल 27.1 किमी प्रति किलो पर्यंत मायलेज देत आहे. म्हणजे ही गाडी खिशाला परवडणारी आहे.

ह्या गाडीत व्हॉइस-इनेबल्ड स्मार्ट सनरूफ आहे. याशिवाय फ्रंट व रिअर डॅशकॅम, 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस Android Auto व Apple CarPlay सपोर्ट असे आधुनिक फीचर्स सुद्धा यामध्ये आहेत. या गाडीत तुम्हाला 6 एअरबॅग्स,

इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट, ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स असे काही सेफ्टी फीचर्स सुद्धा पाहायला मिळतील. कमी किमतीत भन्नाट फीचर्स असणारी गाडी घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच ह्युंदाई कंपनीच्या या गाडीचा विचार करायला काही हरकत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe