Share Market : सप्टेंबर महिना शेअर मार्केट साठी फारच आव्हानाचा राहिला. गेल्या महिन्यात सुरुवातीचे काही दिवस शेअर बाजार दबावात राहिला. इंडियन शेअर मार्केट वर अमेरिकेने लावलेला 50% टॅरिफचा थोडाफार प्रभाव दिसला होता. पण आठ दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा शेअर मार्केट तेजीत दिसून आले.
दरम्यान जर तुम्ही ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच उपयुक्त ठरणार आहे. खरे तर काल एक ऑक्टोबर रोजी शेअर बाजारातील घसरणीचे सत्र थांबले. काल सेन्सेक्स 0.89% वाढून 80983.31 वर बंद झाले.

त्याचवेळी निफ्टी 24836.30 वर बंद झाले. निफ्टी मध्ये सुद्धा काल 0.92% तेजी आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे शेअर मार्केट मधील या तेजीच्या काळात काही स्टॉक्स देखील पुन्हा एकदा तेजीत आले आहे. आज आपण अशा पाच स्टॉक ची माहिती पाहणार आहोत ज्यांच्या किमती 20 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
कालचा दिवस गुंतवणूकदारांसाठी प्रचंड नफ्याचा ठरला. शेअर बाजारात जोरदार उसळी राहिली. टाटा मोटर्ससह अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिलेत. यामुळे शेअर मार्केटमध्ये काल गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून आला. 1 ऑक्टोबरला दिवसभर झालेल्या खरेदीमुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर वधारले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे बातम्यांमुळे देखील काही कंपन्यांचे स्टॉक तेजीत राहिलेत. टाटा मोटर्सच्या डिमर्जरपासून ते नव्या लिस्टिंगपर्यंत अशा अनेक कॉर्पोरेट घडामोडींमुळे शेअर्समध्ये तेजी दिसून आली आणि गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले.
या शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
टाटा मोटर्स – 5.54% उसळून ₹718.15 वर बंद झाला. कंपनीने जाहीर केले आहे की तिचा कमर्शियल व्हेईकल व्यवसाय 1 ऑक्टोबर 2025 पासून वेगळा करण्यात येईल. डिमर्जरनंतर सध्याच्या लिस्टेड कंपनीचे नाव टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड असेल, तर कमर्शियल व्हेईकल व्यवसाय टाटा मोटर्स लिमिटेड या नावाने स्वतंत्ररीत्या लिस्ट होईल. यासाठी 14 ऑक्टोबर 2025 ही रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे.
सन टीव्ही – या कंपनीच्या स्टॉक मध्ये देखील काल जबरदस्त तेजी होती. ह्या कंपनीचा शेअर 1 ऑक्टोबरला 15.33% वाढून ₹602.10 वर बंद झाला. दिवसभरात शेअरने 617.05 रुपयांचा उच्चांक गाठला, जो मागील बंद भावापेक्षा तब्बल 18% जास्त होता.
रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज लिमिटेड – हा शेअर 7.47% वाढून ₹692.50 वर पोहोचला. कंपनीने हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एआय-आधारित Sojern Inc. ही MarTech कंपनी अधिग्रहित करण्यासाठी करार केला आहे.
अटलांटा लिमिटेड – या कंपनीचा शेअर 19.99% वाढीसह अपर सर्किटमध्ये ₹46.64 वर बंद झाला. कंपनीने इरकॉन इंटरनॅशनल सोबत 2,485 कोटी रुपयांचा भंडारा-गडचिरोली एक्सप्रेसवे प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे.
जैन रिसोर्स रीसायकलिंग लिमिटेड – हा शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी फोकस मध्ये राहिला. बीएसई आणि एनएसईवर प्रीमियमसह लिस्ट झाल्यानंतर हा शेअर 19.98% वाढून ₹318.25 वर स्थिरावला होता.