सरकारी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार ! कोणाला मिळणार लाभ ? वाचा…

Published on -

Government Employee News : आज विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जाणार आहे. तसेच येत्या काही दिवसांनी दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरम्यान दिवाळीच्या आधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर दरवर्षी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर होत असतो. यानुसार यंदाही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्याआधी रेल्वे विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला होता.

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला होता. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा बोनस मिळणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना उत्पादकता लिंक्ड बोनस दिला जाणार आहे. हा पीएलबी बोनस 30 दिवसांच्या पगारा एवढा राहणार आहे.

पण बोनसची रक्कम फक्त 6,908 निश्चित करण्यात आलीये. आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना हा बोनस जाहीर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याचा लाभ सर्वच कर्मचाऱ्यांना दिला जाणार नाही. केंद्रीय शासकीय सेवेतील गट ब आणि गट क या संवर्गातील कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे.

याचा लाभ फक्त मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार नाही तर केंद्रीय निमलष्करी दल, सशस्त्र दल व केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकारच्या वेतन संरचनेनुसार पगार घेणाऱ्या नोकरदारांनाही याचा लाभ मिळणार आहे.

पात्र असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा ऍड हॉक बोनस जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने सध्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे अन आनंदाचे वातावरण आहे. इतर कोणताही बोनस किंवा एक्स-ग्रेशिया न मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ दिला जाईल. 

31 मार्च 2025 पर्यंत सेवेत असणाऱ्या आणि किमान सहा महिने सलग काम करणाऱ्यांना याचा लाभ मिळेल. कॅज्युअल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जाणार आहे पण बोनस ची रक्कम कमी राहील. ह्या अशा कर्मचाऱ्यांना 1184 रुपये बोनस दिला जाईल.

अर्थात कॉन्ट्रॅक्ट वर काम करणाऱ्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनस मिळणार आहे. बोनस देताना सात हजार रुपये पगार गृहीत धरण्यात आला आहे. पीएलबी बोनसचे सूत्र 7000×30÷30.4 असे आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe