शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! 1 शेअरवर मिळणार 5 बोनस शेअर, ‘या’ कंपनीची मोठी घोषणा

Published on -

Bonus Share : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जे गुंतवणूकदार बोनस शेअर देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

कारण की एका छोट्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चक्क पाच बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. ऑटो रायडर्स इंटरनॅशनल या कंपनीने ही घोषणा केली असून यामुळे या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:5 या प्रमाणात बोनस शेअरचे वाटप करणार आहे.

अर्थात ज्या शेअर होल्डर्सच्या डिमॅट अकाउंट मध्ये रेकॉर्ड डेट पर्यंत कंपनीचा एक शेअर असेल त्यांना पाच बोनस शेअर मिळणार आहेत. या कंपनीने अलीकडेच बोनस शेअर वाटपाची घोषणा केली असून याची रेकॉर्ड अद्याप निश्चित झालेली नाही. पण लवकरच कंपनीकडून याची रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात येणार आहे.

कंपनीच्या या घोषणेनंतर एक ऑक्टोबरला कंपनीचे स्टॉक तेजीत आले होते. काल या कंपनीच्या स्टॉक मध्ये पाच टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. याच्या स्टॉकला बुधवारी अप्पर सर्किट लागले.

महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने याआधी सुद्धा बोनस स्टॉकचे वाटप केले आहे. 2017 मध्ये कंपनीने 1:1 या प्रमाणात आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर दिले आहेत.

या कंपनीचा स्टॉक एक ऑक्टोबर रोजी 2741.20 रुपयांवर क्लोज झाले आहेत. दरम्यान आता आपण या कंपनीची गेल्या एका वर्षाची शेअर मार्केट मधील कामगिरी कशी राहिली आहे याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

गुंतवणूकदारांना किती रिटर्न दिलेत?

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील माहितीनुसार स्मॉलकॅप कंपनी ऑटोरायडर्स इंटरनॅशनलचे शेअर्स गेल्या एका वर्षात चांगलेच तेजीत राहिले आहेत.

या कंपनीच्या स्टॉकने केलेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. तीन महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 207% ची चांगली मोठी वाढ झाली आहे.

तसेच गेल्या सहा महिन्यांमध्ये या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 684 टक्क्यांची रिटर्न दिले आहेत. या वर्षात आत्तापर्यंत या कंपनीचे शेअर्स 871 टक्क्यांनी वाढले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे मागील बारा महिन्यांमध्ये कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1819 टक्क्यांचा जोरदार परतावा दिला आहे. ऑटोरायडर्स इंटरनॅशनलच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2741.20 रुपये आहे.

तसेच या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक 149.90 रुपये आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या स्टॉक ने गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत

शिवाय आता बोनस शेअरची घोषणा करण्यात आली असल्याने कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकस मध्ये आहेत. यामुळे येत्या काळात या स्टॉकच्या किमती आणखी वाढू शकतात. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe