Oneplus 15 Launch : नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करणार आहात का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. वनप्लस लवकरच आपला एक फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
हा स्मार्टफोन ज्या दिवशी भारतात लॉन्च होईल त्याच दिवशी याची ग्लोबल लॉन्चिंग राहणार असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे जर तुम्हीही येत्या काळात नवीन प्रीमियम स्मार्टफोन घेणार असाल तर ही तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे.

खरेतर अलीकडेच वनप्लस कंपनीने आपल्या पुढच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची घोषणा केली. तेव्हापासूनच मार्केटमध्ये या फोन बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. OnePlus 15 13 नोव्हेंबर रोजी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. अद्याप कंपनीकडून या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पण रिपोर्ट्समध्ये पुढल्या महिन्यात हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारतात लॉन्च होण्याआधी तसेच ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च होण्याआधी हा स्मार्टफोन चायना मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
हा फोन 27 ऑक्टोबरला चीनमध्ये लॉन्च केला जाणार आहे. वनप्लसच्या नव्या फोनमध्ये कंपनीने अत्याधुनिक प्रोसेसरचा वापर केला आहे. यात Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर देण्यात आले आहे.
हा 3nm आर्किटेक्चरवर आधारित 8-कोर CPU असून यात 4.6GHz क्लॉक स्पीड असलेले कोर्स दिले आहेत. क्वालकॉमच्या मते हा CPU सिंगल-कोर परफॉर्मन्स 20% व मल्टी-कोर परफॉर्मन्स 17% ने वाढवतो. यात नवा Hexagon NPU देण्यात आला आहे जो मागील जनरेशनपेक्षा 37% जलद आहे.
तसेच फास्ट 5G इंटरनेटसाठी Snapdragon X85 5G Modem RF System देखील दिला गेला आहे. वनप्लस 15 मध्ये इंडस्ट्रीतील पहिला micro-arc oxidation treatment असलेला अॅल्युमिनियम फ्रेम वापरला गेला आहे.
कंपनीचा दावा आहे की हा फ्रेम रॉ अॅल्युमिनियमपेक्षा 3.4 पट जास्त टफ व टायटॅनियमपेक्षा 1.5 पट मजबूत असेल. या फोनमध्ये 165Hz रिफ्रेश रेट असलेला फ्लॅट डिस्प्ले, अल्ट्रा-नॅरो बेजल्स आणि 16GB RAM स्टँडर्ड स्वरूपात मिळेल.
टॉप व्हेरियंटमध्ये 1TB स्टोरेज दिले जाऊ शकते. यात 50MP OIS मेन कॅमेरा, 50MP पेरिस्कोप लेन्स व अल्ट्रा-वाइड सेन्सर मिळणार आहे. पॉवरसाठी 7,000mAh बॅटरी दिली जाणार आहे.
हा फोन Sand Storm कलर मध्ये लॉन्च केला जाईल. याची किंमत किती असणार या संदर्भात अजून तरी कोणतेच माहिती समोर आलेली नाही. पण हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन राहणार असल्याने याची सुरुवातीची किंमत 65 – 70 हजार रुपयांच्या घरात राहू शकते.