तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न

Published on -

Post Office Scheme : तुम्हालाही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी फारच खास राहणार आहे. खरंतर सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघाला की बँकेच्या एफडी योजनांचा पर्याय पुढे येतो.

पण यावर्षी बँकांच्या एफडी योजनांवरील व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.

अनेक जण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत गुंतवणूक करत आहे. अशा स्थितीत जर तुम्हाला ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी पोस्टाच्या एफडी योजनेची डिटेल माहिती घेऊन आलो आहोत.

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेलाच एफडी म्हणून ओळखले जाते. पोस्ट ऑफिस ने आपल्या एफडी योजनांवरील व्याजदर रेपो रेटमध्ये कपात झानंतरही कायम ठेवले आहेत.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच चांगले व्याज मिळते. अशा स्थितीत जर तुम्हाला एफडी करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाचा पर्याय बेस्ट आहे.

कशी आहे पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना?

पोस्टाची एफडी योजना एक वर्षांपासून पाच वर्षांपर्यंतची आहे. यातील एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9 टक्के दराने व्याज दिले जाते. दोन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास सात टक्के दराने व्याज मिळते.

तीन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.10% दराने व्याज दिले जाते. तसेच पाच वर्षांच्या एफ डी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहेत. दरम्यान आता आपण पोस्टाच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेत एका लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणारी याबाबत माहिती पाहूयात. 

कशी आहे 24 महिन्यांची एफडी योजना ?

गुंतवणूकदारांनी दोन वर्षांच्या एफडी योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना सात टक्के दराने एक लाख 14 हजार 888 रुपये मिळणार आहेत.

गुंतवणूकदारांना 14888 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील. नक्कीच जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या नावे एफडी करायचे असेल तर पोस्टाचा हा पर्याय तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe