Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन

Published on -

Motorola Upcoming Smartphone : तुम्हालाही तुमच्याकडील स्मार्टफोन चेंज करायचा आहे का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मोटोरोला प्रेमींसाठी खास ठरणार आहे. कारण की मोटो लवकरच एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असून याबाबतची माहिती स्वतः कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दिली आहे.

त्यामुळे जर तुम्ही ही मोटरचा नवा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही काही काळ वाट पाहायला काही हरकत नाही. कंपनी लवकरच भारतीय मार्केटमध्ये नवीन हँडसेट लॉन्च करणार आहे. मोटरोला इंडियाने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवर Moto G06 Power स्मार्टफोनबाबत माहिती दिली आहे.

या स्मार्टफोनचा टीजर ऑफिशियल साइटवर अपलोड झाले असल्याने येत्या काही दिवसांनी हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध होईल अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. मोटोरोलाचा मोटो G06 पॉवर स्मार्टफोन भारतीय बाजारात शोकेस करण्यात आलाय.

आता लवकरच याची इंडियन मार्केटमध्ये एन्ट्री होणार आहे. तसेच कंपनीने या स्मार्टफोनचे टिजर “भविष्य पूर्ण ताकदीने येत आहे” या टॅगलाइनसह जारी केले आहे. शिवाय, पोस्टमध्ये, ब्रँडने म्हटले आहे की हा नवा हँडसेट “शक्तीचा एक नवीन मार्ग” आणेल.

ब्रँडने स्मार्टफोनच्या डिझाइनची एक झलक सुद्धा जारी केली आहे. यानुसार या नव्या हँडसेटचे डिझाईन हे आधीच्या G05 मॉडेल प्रमाणेच राहणार असे दिसते. अद्याप या स्मार्टफोन बाबत फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. पण, ब्रँड यावेळी आपल्या Moto G06 Power टेक्सचर्ड बॅक डिझाईनमध्ये बाजारात लॉन्च करणार असल्याचे दिसते.

यात मागील बाजूस वरच्या डाव्या कोपऱ्यात ब्लेंडेड रिअर कॅमेरा मॉड्यूल दिलेले आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये दोन कॅमेरा सेन्सर्स उभ्या रचनेत बसवलेले आहेत, तसेच पहिल्या कॅमेरा युनिटच्या उजव्या बाजूला एक LED लाईट स्ट्रिपही आहे. कोपरे गोलाकार आहेत. तसेच उजव्या साईड पॅनलवर व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण पाहायला मिळतात.

महत्वाची बाब म्हणजे हा अपकमिंग स्मार्टफोन यावेळी ग्राहकांना हिरव्या रंगांच्या पर्यायात सुद्धा उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. सध्या स्मार्टफोन मेकर कंपन्या रंगांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. अलीकडेच एप्पलने भगव्या कलर मध्ये आपली iPhone 17 सीरीज लाँच केली.

या पाठोपाठ आता मोटो कडूनही हिरव्या रंगात नवीन हँडसेट लॉन्च होण्याची शक्यता आहे. Moto G05 स्मार्टफोन 5200mAh बॅटरीसह आला होता. आता ब्रँड Moto G06 Power मॉडेलमध्ये यापेक्षा मोठी बॅटरी देऊ शकते असा अंदाज आहे. मोटोचा नवा फोन आधीच्या तुलनेत अधिक पावरफुल असेल. पण याची लॉन्चिंग कधी होणार? हा प्रश्न कायम आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe