शेअर मार्केटमधील ‘ही’ आयटी कंपनी देणार 5.75 रुपयांचा Dividend ! रेकॉर्ड डेट कोणती?

Published on -

Dividend Share : शेअर मार्केट मधील एका मोठ्या आयटी कंपनीने आपल्या शेअर होल्डर साठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.

खरे तर कंपन्या वेळोवेळी आपल्या शेअर होल्डर्सला बोनस शेअर्स तसेच लाभांश देण्याची घोषणा करत असतात. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजने पण या आर्थिक वर्षात दुसरा अंतरीम लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला एक रुपये फेस व्हॅल्यूच्या शेअरसाठी 5.75 रुपये प्रति शेअर याप्रमाणे लाभांश देणार आहे. यामुळे कंपनीच्या शेअर होल्डर्स ला मोठा फायदा होईल अशी आशा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याची रेकॉर्ड डेट सुद्धा कंपनीकडून निश्चित करण्यात आली आहे.

पुढील आठवड्यात यासाठीची रेकॉर्ड डेट फायनल करण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याची रेकॉर्ड 10 ऑक्टोबर 2025 ठरविण्यात आली असून या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डर्सकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना याचा फायदा मिळणार आहे.

कंपनीने बुधवारी डिविडेंट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीचे स्टॉक पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. Dividend च्या घोषणेनंतर ही कंपनी परत एकदा चर्चेत आली आहे. काल ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी वाढ सुद्धा झाली होती.

पण आज शुक्रवारी शेअर्स मध्ये 0.81 टक्क्यांची घसरण झालीये. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये थोडीशी संभ्रमावस्था आहे. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 41 हजार 163 कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स 19 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले आहेत.

कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 745.50 रुपयांवर लिस्ट झालेत. आयपीओमध्ये एका शेअरची किंमत 708 रुपये होती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचे शेअर 731 रुपयांवर उघडले होते. दरम्यान, काल या कंपनीचे शेअर 676.10 रुपयांवर व्यवहार करत होते.

आज मात्र यात थोडी घसरण झालीये. या आयटी कंपनीच्या घोषणेनंतर सध्या कंपनीचे स्टॉक फोकसमध्ये आहेत. पुढील काही दिवस गुंतवणूकदारांचे या शेअरकडे विशेष लक्ष राहणार आहे. आता येत्या काळात शेअर्सच्या किमतीवर काय प्रभाव पडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe