Share Market मध्ये 6 महिन्यात पैसे डबल ! ‘या’ कंपनीत गुंतवणूक करणारे शेअरहोल्डर्स झालेत मालामाल, वाचा सविस्तर 

Published on -

Share Market Tips : गेल्या काही महिन्यांपासून भूराजकीय तणावांमुळे शेअर मार्केट अस्थिर बनले आहे. पण तरीही गेल्या सहा महिन्यांच्या काळात काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवलय. दरम्यान आज आपण अशाच एका स्टॉक बाबत माहिती पाहणार आहोत ज्याने गेल्या सहा महिन्यांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत.

नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया या शेअर्सने आपल्या शेअर होल्डर्स ला मागील सहा महिन्यांमध्ये जबरदस्त रिटर्न दिले आहेत. सहा महिन्यात पैसे डबल करणारा हा स्टॉक अजूनही तेजीतच आहे. अनेक गुंतवणूकदार या स्टॉकची खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे हा स्टॉक अजूनही फोकस मध्ये आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे काल शुक्रवारी या स्टॉक मध्ये सात टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. मागील पूर्ण आठवडा या स्टॉक साठी सकारात्मक राहिला. या संपूर्ण आठवड्यात नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढलेत. सध्या हा स्टॉक 4336 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय.

पण शेअर मार्केट मधील अस्थिर परिस्थिती, भूराजकीय ताणतणाव असतांनाही या स्टॉकच्या किमती एवढ्या का वाढत आहेत? याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत. गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केट प्रचंड दबावात आहे. मार्केट तेजीसाठी प्रचंड संघर्ष करताना दिसतय. पण नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने गत सहा महिन्यांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवलंय.

मागील सहा महिन्यांच्या काळात कंपनीचे स्टॉक 175 टक्क्यांनी वाढलेत. विशेष म्हणजे गेल्या पाच आठवड्यांच्या काळात हा स्टॉक तब्बल 11 वेळा आपल्या ऑल टाईम हाय वर पोहोचला. यामुळे सध्या या स्टॉकची जोरदार चर्चा सुरू आहे. हा स्टॉक एवढा तेजीत का येतोय याबाबतही अनेकचर्चा होत आहेत. 

तेजीचे कारण काय?

कंपनीच्या एआय (Artificial Intelligence) तसेच हाय परफॉर्मन्स कंप्युटिंग क्षेत्रातील विस्तारामुळे या स्टॉक मध्ये गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवलाय. Ai मुळे या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. कंपनीचा मेन उद्देश एआय सेगमेंटमध्ये अधिक वाढ करण्याचा आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या एकूण महसुलात 29 टक्के योगदान एआय विभागाचे होते, तर दोन वर्षांपूर्वी हे फक्त 7 टक्के होते. अर्थात Ai विभागाच्या कामगिरीमुळेच या कंपनीचे स्टॉक चांगले तेजीत आले आहेत.

महत्वाची बाब म्हणजे हा विभाग वार्षिक 40 टक्के दराने पुढे वाढत राहणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अशातच गेल्या आठवड्यात नेटवेब टेक्नॉलॉजी इंडियाला एक मोठ वर्क ऑर्डर मिळालय. त्यामुळे गेल्या आठवड्यात या कंपनीचे स्टॉक 14 टक्क्यांनी वाढलेत.

कंपनीला एआय जीपीयू अॅक्सिलरेटेड सिस्टिम्ससाठी 450 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यापूर्वी कंपनीला एनव्हिडिया ब्लॅकवेलकडून 1734 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. जून 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीकडे एकूण 4142 कोटी रुपयांचे ऑर्डर बुक आहे.

पहिल्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 30.50 कोटी रुपये इतका झाला. वार्षिक आधारावर यात 100 टक्के वाढ दिसत आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe