Diwali Bonus : येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे आणि यामुळे सध्या सगळीकडे अगदीच आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान दिवाळीच्या आधीच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. या संबंधित प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना 65 कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे. खरंतर महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो. यंदाही महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला असून या निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना 8.33% सानुग्रह अनुदान व 20 हजार रुपये जादा दिले जाणार आहेत. नक्कीच या निर्णयाचा पिंपरी चिंचवड महापालिकेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची दिवाळी या निमित्ताने गोड होईल अशी आशा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ व महापालिका आयुक्तांसोबत दिवाळी बोनस बाबत एक करार करण्यात आला आहे. यानुसार दरवर्षी दिवाळी बोनस मिळतोय. महासंघ व महापालिकेत दर पाच वर्षांसाठी दिवाळी बोनस बाबत करार करण्यात येत असतो.
सध्या ज्या करारा अंतर्गत बोनसची रक्कम मिळत आहे तो करार 2021 मध्ये झालाय. या अंतर्गत महापालिकेत कार्यरत असणाऱ्या वर्ग 1 वर्ग 4 मधील सर्व अधिकार्यांना व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस चा लाभ दिला जाणार आहे. खरे तर कर्मचारी महासंघाने जुलै च्या पहिल्या आठवड्यात महापालिकेकडे बोनस बाबत निवेदन दिले होते.
दरम्यान या मागणीनंतर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून 30 सप्टेंबर रोजी महासंघाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. दरम्यान सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयाला काल मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काल तीन ऑक्टोबर 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. महापालिकेतील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस चा लाभ देण्यात येईल.
परंतु सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, महापालिकेच्या पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच बोनसची रक्कम वर्ग करण्यात यावी असे आदेश आयुक्तांकडून यावेळी देण्यात आली आहे.