Bonus Share : बोनस शेअर मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी हर्षील ॲग्रोटेक लिमिटेडच्या स्टॉक बाबत आहे. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणाऱ्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
Harshil Agrotech Ltd ने आपल्या शेअर होल्डर्स ला दहा बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे सध्या या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे याची रेकॉर्ड डेट सुद्धा फायनल करण्यात आली आहे. बोनस शेअरची रेकॉर्ड डेट या महिन्यातच आहे.

अशा स्थितीत आज आपण हर्षील ॲग्रोटेक लिमिटेड च्या बोनस शेअर संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, पात्र गुंतवणूकदारांना 32 शेअर्स मागे दहा बोनस शेअर्स मिळणार आहेत. यासाठीची रेकॉर्ड येत्या सहा दिवसांनी आहे.
10 ऑक्टोबर 2025 ही या बोनस शेअर साठीची रेकॉर्ड डेट फायनल करण्यात आली आहे. अर्थात या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डर्स कडे कंपनीचे स्टॉक असतील त्यांनाच बोनस ईश्यूचा लाभ देण्यात येणार आहे. दरम्यान आता आपण या कंपनीच्या स्टॉकबाबत माहिती पाहुयात.
मागील एक वर्ष राहिलाय आव्हानाचा
या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या शेअर होल्डर्स साठी मागील एक वर्ष कठीण राहिले आहे. गेल्या एका वर्षात कंपनीने निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. या काळात कंपनीचे स्टॉक 89 टक्क्यांनी घसरले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बोनस शेअरच्या घोषणेनंतरही कंपनीचे स्टॉक विशेष तेजित आलेले नाहीत. हर्षिल एग्रोटेक लिमिटेडचे स्टॉक शुक्रवारी चार टक्क्यांनी घसरलेत.
या कंपनीचे स्टॉक 0.72 वर क्लोज झालेत. ही स्टॉकची 52 आठवड्याची लो प्राईस आहे. तसेच स्टॉकची 52 आठवड्याची हाय प्राईस 11.79 आहे. पण गेल्या 2 वर्षांत हर्षिल अॅग्रोटेक लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत 242 टक्क्यांची वाढ झालीये.
तसेच तीन वर्षांत या शेअरने शेअर होल्डर्स ला 414 टक्क्यांचा परतावा दिला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत शेअर्स 1100 टक्क्यांनी वाढलेत. तर, दहा वर्षांत या कंपनीने पोझिशनल गुंतवणूकदारांना तब्बल 2300 टक्क्यांचा परतावा दिलाय.
अर्थात लॉंग टर्म मध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. पण शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांना यातून अपेक्षित परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदार थोडे हैराण आहेत. पण आता या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे कदाचित या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा तेजीत येऊ शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे ही कंपनी पहिल्यांदाच एक्स बोनस ट्रेड करणार आहे. अर्थात कंपनीचा इतिहासात पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर मिळतील. पण कंपनीने याआधी शेअर स्प्लिट केले आहेत.
या शेअर्सचे 2024 मध्ये 10 तुकड्यांमध्ये विभाजन करण्यात आले होते. त्यावेळी कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपयांवरून कमी करून 1 रुपया प्रति शेअर करण्यात आली होती. आता या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बोनस शेअर मिळणार आहेत.