Honda SUV Price Drop : अलीकडे Suv कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सेडान ऐवजी आता SUV ला अधिक पसंती दाखवली जात आहे. दरम्यान जर तुमचा येत्या काळात नवीन एसयूव्ही घेण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. खरे तर क्रेटाला टक्कर देणाऱ्या एका लोकप्रिय एसयुव्हीच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.
Honda Elevate या गाडीच्या किमतीत कपात करण्यात आली असून ज्यांना ऑक्टोबर मध्ये नवीन गाडी घ्यायची असेल त्यांच्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे. या महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे अशा स्थितीत अनेकजण दिवाळीला नवीन एसयुव्ही खरेदी करतील.

दरम्यान जर तुम्हाला ही दिवाळी तर नवीन एसयूव्ही खरेदी करायची असेल तर होंडा कंपनीची ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. ह्या महिन्यात कार खरेदीदारांसाठी होंडा कंपनीची ही जबरदस्त ऑफर नक्कीच आर्थिक फायद्याची राहणार आहे.
लोकप्रिय SUV होंडा एलिवेटवर कंपनीकडून सर्वात जास्त डिस्काउंट दिला जातो. या मॉडेलच्या टॉप-स्पेक ZX ट्रिम वर ग्राहकांना 1.32 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जातोय. तसेच VX व्हेरिएंट वर 73 हजार, V ट्रिम वर 57 हजार व बेस SV व्हेरिएंट वर 25 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत असल्याची माहिती डीलर्सकडून मिळाली आहे.
पण तरीही या डिस्काउंट ऑफर बाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही एकदा तुमच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधावा लागणार आहे. आता आपण या गाडीचे स्पेसिफिकेशन समजून घेणार आहोत.
कसे आहेत स्पेसिफिकेशन्स?
होंडा एलिवेटमध्ये ग्राहकांना 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 121 बीएचपी पॉवर व 145 एनएम टॉर्क निर्माण करू शकते. या SUV मध्ये ग्राहकांना दोन ट्रान्समिशन पर्याय मिळतात. मॅन्युअल व ऑटोमॅटिक या दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन मध्ये ही गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एलिवेट SUV मध्ये अनेक भन्नाट फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतील.
यात 10.25-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंचाचा सेमी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, तसेच सिंगल पेन सनरूफ सुद्धा देण्यात आले आहे. सेफ्टी फीचर्स म्हणून या कार मध्ये तुम्हाला सहा एअरबॅग्स मिळणार आहेत. ही गाडी क्रेटा, ग्रँड विटारा अशा गाड्यांसोबत स्पर्धा करते.